Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि युट्यूब स्टार धनश्री वर्मा यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. २०२० मध्ये कोरोना काळ सुरू असताना युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी आपल्या नातेसंबंधांबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले. सुरुवातीच्या काळात हे दोघेही आपल्या सोशल मीडियावरून कपल फोटो आणि इतरही मजेशीर रिल शेअर करताना दिसत होते. पण दीड-दोन वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला. हळूहळू त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही सुरू झाल्या आणि अखेर मार्च २०२५ मध्ये त्या चर्चा खऱ्या ठरल्या. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात या दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले. या प्रकरणानंतर सुमारे पाच महिन्यांनी युजवेंद्र चहलने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले. याचवेळी त्याने धनश्रीशी शेवटचं बोलणं कधी झालं, याबद्दलही सांगितलं.
शेवटचं बोलणं कधी झालं?
"आम्ही बऱ्याच महिन्यांपासून बोलत नव्हतो. घटस्फोट होण्याच्या ६-७ महिने आधीपासूनच आम्ही बोलणं बंद केलं होतं. फक्त काही कामासंदर्भात असेल तरच आम्ही बोलायचो. १९ जुलैच्या वर्ल्ड कप फायनलनंतर आमचं बोलणं खूपच कमी झालं. IPL 2025 साठी जो खेळाडूंचा लिलाव होणार होता, त्याआधी अंदाजे सप्टेंबर २०२४ मध्ये आमचा वकिलांच्यामार्फत एक व्हिडीओ कॉल झाला. त्या व्हिडीओ कॉलमध्ये आमचं शेवटचं एकमेकांशी बोलणं झालं. त्यानंतर मग आम्हा दोघांपैकी कुणीही एकमेकांशी आजपर्यंत काहीही बोललेलं नाही. मेसेज देखील नाही," असे युजवेंद्र चहलने स्पष्टपणे सांगितले.
हेदेखील वाचा: "ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
घटस्फोटाआधी काय चर्चा झाली?
"आम्ही दोघांनीही आमच्या परीने नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही एकमेकांशी बऱ्याचदा बोललो. पण गोष्टी सोप्या होण्याऐवजी आणखी कठीण होत गेल्या. मी माझ्या बाजूने सगळे प्रकार केले. पण नातं वाचवणं शक्य झालं नाही. घटस्फोटानंतर काय करणार याबद्दलही आम्ही एकमेकांशी चर्चा करायचा प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली. पण गोष्टी बिघडतच गेल्या आणि मग आम्ही जुलै २०२४ नंतर घटस्फोटाच्या निर्णयावर आलो," असेही चहलने स्पष्ट केले.
Web Title: Cricketer Yuzvendra Chahal tales last conversation with Dhanashree Verma amid divorce revelation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.