Join us  

क्रिकेटर युवराज सिंहने घेतली BMW G 310 R बाईक, जाणून घ्या खासियत

टीम इंडियाचा फटकेबाज खेळाडू युवराज सिंह सध्या टीममध्ये नसला तरी वेगवेगळ्या कारणांनी तो चर्चेत असतो. युवराज आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या बाईकमुळे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 1:03 PM

Open in App

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फटकेबाज खेळाडू युवराज सिंह सध्या टीममध्ये नसला तरी वेगवेगळ्या कारणांनी तो चर्चेत असतो. युवराज आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या बाईकमुळे. युवराजचं बाईक प्रेम हे सर्वांनाच माहीत आहे. आता त्याने  BMW  310 R ही अफलातून बाईक खरेदी केली आहे. 

युवराजचे या आलिशान बाईकसोबतचे फोटो सोशल मीडिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. महत्त्वाची गोष्टी म्हणजे युवराज स्वत: या बाईकची डिलिव्हरी घेण्यासाठी कंपनीच्या शो-रुममध्ये गेला होता.  

युवराजकडे BMW G 310 R व्यतिरिक्त BMW X6 M, Audi Q5, BMW 3 Series, Bentley Continental Flying Spur सारख्या महागड्या कारही आहेत. काही वर्षांपूर्वी युवराजने Lamborghini Murcielago ही कारही खरेदी केली आहे. तसेच त्याच्याकडे  E46 BMW M3 ही कर्न्व्हटेबल कारही आहे. 

BMW G 310 R या बाईकची एक्स-शोरुम किंमत २.९९ लाख रुपये आहे. BMW G 310 R ही बाईक कंपनीने टीव्हीएससोबत तयार केली आहे. ही बाईक गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा केली जात होती.

या बाईकमध्ये BMW G 310 R मध्ये 313 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ३४ बीएचपीची पॉवर आणि २८एनएमचा टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसोबत ६ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलंय. तसेच ड्युअल-चॅनल एबीएस सुद्धा देण्यात आलं आहे. 

टॅग्स :युवराज सिंगबाईकवाहनबीएमडब्ल्यू