ठळक मुद्देSmriti Mandhana चा फोटो होतोय Social Media वर व्हायरल.नेटकरीही झाले घायाळ.
सध्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (India vs New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) क्रिकेटचे चाहते व्यस्त आहेत. असं असलं तरी भारतीय महिला क्रिकेट संघही यादरम्यान चर्चेत आहे.
भारतीय महिला संघाला (India Women's Cricket Team) ब्रिस्टलमधील (Bristol) इंग्लंडच्या संघाविरोधातील सामना बरोबरीत सोडवण्यात अपयश आलं. परंतु या संघातील अनेक खेळाडूंचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आपल्या फलंदाजीशिवाय आपल्या लूक्ससाठीही चर्चेत राहिली.
फोटो व्हायरल
स्मृती मंधानानं पहिल्या डावात ७८ तर दुसऱ्या डावात ८ धावा केल्या. या मॅचच्या दरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा सुरू असून नेटकरीही तिचे फोटो पाहून घायाळ झाले आहे. एका नेटकऱ्यानं तर ती बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षाही सुंदर असल्याचं म्हटलं.