Join us

'हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची 'कंगना रणौत'...'; आणखी एका वादावर चाहते भडकले!

अनेक चाहते हार्दिक पांड्याची तुलना कंगना रणौतशी करत आहेत. कारण कंगना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादात असते आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत येतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 17:00 IST

Open in App

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) T20 विश्वचषक स्पर्धनंतर मंगळवारी सकाळी दुबईहून भारतात आला. यावेळी मुंबई विमानतळावर त्याची दोन घड्याळं जप्त करण्यात आली. पंड्या या घड्याळांची बिले देऊ न शकल्याने मुंबईच्या सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर चाहतेही हार्दिक पांड्यावर जबरदस्त भडकले असून राग व्यक्त करत आहेत.

अनेक चाहते हार्दिक पांड्याची तुलना कंगना रणौतशी करत आहेत. कारण कंगना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादात असते आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत येतो. अगदी कॉफी विथ करणपासून ते घड्याळ कांडापर्यंत पांड्या आणि वादांचेही चोळी बांगडीचे नाते आहे.

सध्या अनेक चाहते पांड्यावर भडकलेले आहेत आणि  ते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. हा खेळाडू काय फक्त पैशांसाठीच क्रिकेट खेळतो? हा काय वर्ल्डकपमध्ये सुट्ट्यांसाठी गेला होता का? पांड्या टाइमपास आणि मॉडेलिंगसाठी क्रिकेट खेळत आहे का? असे प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याकंगना राणौतसोशल मीडिया
Open in App