श्रीलंकन क्रिकेटर भानुका राजपक्षे आणि अभिनेत्री हर्षी रसंगा यांच्यातील वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. भानुका राजपक्षे याने तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर, ९ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी (गोल्ड चेन) परस्पर गहाण ठेवल्याप्रकरणी थलंगगामा पोलिसांनी हर्षी रसंगाला अटक केली.
राजपक्षेने दिलेल्या कायदेशीर नोटीशीनुसार, त्याने अभिनेत्रीला ही साखळी तात्पुरती वापरण्यासाठी दिली होती, मात्र तिने ती कुोठलीही माहीती न देता गहाण ठेवली. यानंतर, कडुवेला दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीदरम्यान हर्षीने आपली चूक मान्य केली आहे. तसेच, आपण ही साखळी भानुका राजपक्षेला परत देऊ असे आश्वासनही दिले. न्यायालयाने तिला ५-५ लाखांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. मात्र, जामीन मिळताच हर्षीने सोशल मीडियावर या प्रकरणाला एक वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.
हर्षीने सोशल मीडिया म्हटले आहे, "राजपक्षे याच्याशी आपले प्रेमसंबंध होते आणि त्याने ही साखळी आपल्याला 'गिफ्ट' स्वरुपात दिली होती. क्रिकेटपटू भानुका राजपक्षे यांच्याकडून या दाव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. न्यायालयाने २२ एप्रिलच्या पुढील सुनावणीत ही सोन्याची साखळी हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
भानुका राजपक्षेने श्रीलंकन क्रिकेट संघासाठी पाच एकदिवसीय आणि ४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात त्याने अनुक्रमे ८९ आणि ७४४ धावा केल्या आहेत. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना २०२१ मध्ये खेळला आहे. त्याने शेवटचा टी-२० सामना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खेळला. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ससाठी दोन हंगामांत खेळला आहे. २०२२ च्या हंगामात त्याने ९ सामने खेळून २०६ धावा केल्या होत्या तर २०२३ मध्ये त्याने केवळ चार सामने खेळत फक्त ७१ धावाच केल्या होत्या.
Web Summary : Sri Lankan cricketer Bhanuka Rajapaksa filed a complaint against actress Harshi Rasanaga, leading to her arrest for allegedly pawning his gold chain. She admitted her mistake in court, promising to return the chain. She was granted bail and the court ordered the chain's return by April 22nd.
Web Summary : श्रीलंकाई क्रिकेटर भानुका राजपक्षे की शिकायत पर अभिनेत्री हर्षी रसंगा गिरफ्तार। आरोप है कि उन्होंने राजपक्षे की सोने की चेन गिरवी रख दी। हर्षी ने अदालत में गलती मानी और चेन लौटाने का वादा किया। उसे जमानत मिल गई और अदालत ने 22 अप्रैल तक चेन वापस करने का आदेश दिया।