Join us

Team India: राहुल द्रविडनंतर 'हा' भारतीय दिग्गज होणार टीम इंडियाचा हेड कोच! मोठे अपडेट आले समोर...

Indian Team: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 20:38 IST

Open in App

Team India: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण होणार, याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर होणाऱ्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपत आहे. परंतू BCCI ने टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची निवड आधीच केल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल द्रविडचा करार संपल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक असतील. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने राहुल द्रविडला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याचा विचार न केल्यास व्हीव्हीएस लक्ष्मणला पुढील मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. NCA मध्ये नवीन पिढीचे खेळाडू तयार करण्याव्यतिरिक्त, लक्ष्मणने अनेकदा संघाची जबाबदारी सांभाळली आहे.

राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत 48 वर्षीय लक्ष्मणने अनेकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आयर्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेसाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 आणि जून 2022 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण संघासोबत होते. द्रविडला कोरोनाची लागण झाली, तेव्हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी-20 आशिया कपमध्येही लक्ष्मण प्रमुख कोच होते.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघराहुल द्रविड
Open in App