Join us

धोनीच्या चेन्नई टीमचा पुढचा कर्णधार मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो? या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केले विधान

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये जोरदार खेळी करत अनेकांची मनं जिंकली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:56 IST

Open in App

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये जोरदार खेळी करत अनेकांची मनं जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकल हसीने ऋतुराज गायकवाड आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांच्यात एका गोष्ट समान असल्याचे म्हटले आहे. मायकल हसी सध्या चेन्नई सुपर किंग्जचे कोच आहेत. त्यांनी महेंद्रसिंह धोनी आणि ऋतुराजसोबत काम केले असून, ऋतुराजने २०२१ च्या आयपीएलमध्ये चांगली खेळी करत ऑरेंज कपही जिंकला आहे.  

ऋतुराज शांत स्वभावाचा आहे, भविष्यात तो नेतृत्व करु शकतो. चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्यात काय योजना आहे माहित नाही, पण धोनी सारखा ऋतुराजही शांत आहे, तो अडचणीत असला तर जास्त बोलत नाही, काम करत राहतो. तो खेळाचा चांगला रीडरही आहे.  

IPL Auction 2022: हे 10 गोलंदाज गाजवणार IPL 2023चा लिलाव; सगळ्या फ्रँचायझींचे असणार लक्ष!

मायकल हसी यांनी ऋतुराज गायकवाडचे कौतुक केले आहे. ऋतुराज हा अत्यंत शिस्तप्रिय खेळाडू आहे, तो महेंद्रसिंह धोनीला फॉलो करतो, त्यांच्यासारख वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात अन्य खेळाडूंपेक्षा नवीन शिकण्याची जास्त इच्छा आहे, असंही त्यांनी म्हटले आहे. 

ऋतुराजच्या या स्वभावामुळे त्याला सर्व प्लेअर रिस्पेक्ट देतात. त्याच्याकडे काही उत्कृष्ट नेतृत्व गुण आहेत. ऋतुराजने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये जोरदार खेळी केली. एका ओव्हरमध्ये त्याने सात षटकार मारत नवा रेकॉर्ड बनवला आहे.  

टॅग्स :ऋतुराज गायकवाडऑफ द फिल्ड
Open in App