Join us
Daily Top 2Weekly Top 5

Big News : पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

कोरोना व्हायरसच्या संकटात होणारी ही पहिलीच व्यावसायिक ट्वेंटी-20 लीग असणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 12:33 IST

Open in App

कोरोना संकटाच्या काळात 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेनंतर इंग्लंड-पाकिस्तान मालिका होणार आहे. पण, सर्वांना ट्वेंटी-20 क्रिकेटचा थरार अनुभवायचा आहे आणि त्यासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. 18 ऑगस्टपासून ट्वेंटी-20 लीगला सुरुवात होणार असून भारताचा फिरकीपटू प्रविण तांबे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे.

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

18 ऑगस्टपासून कॅरेबीयन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे आणि 20 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होणार आहे. संपूर्ण स्पर्धा त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे होणार आहे. या लीगला स्थानिक प्रशासन आणि सरकारने मान्यता दिली आहे. ''सर्व संघांना आणि अधिकाऱ्यांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि प्रत्येकाला पहिले दोन आठवडे क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. परेदाशातून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूची प्रवासापूर्वी आणि येथे दाखल झाल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे,''असे आयोजकांकडून सांगण्यात आले.   या लीगमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार नाही. या लीगमध्ये रशीद खान, ख्रिस लीन, सोहैल तन्वीर, मोहम्मद नबी, मार्कस स्टॉयनिस, रॉस टेलर आणि कार्लोस ब्रेथवेट या स्टार खेळाडूंचा समावेश असणार आहे. भारताचा प्रविण तांबे या लीगमध्ये खेळणार आहे. त्यानं त्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शाहरुख खानच्या त्रिनिदाद नाइट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. गतवर्षी दुबईतील एका लीगमध्ये खेळल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ कोलकाता नाइट रायडर्सने त्याला निलंबित केले होते.  

 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगशाहरुख खानटी-20 क्रिकेट