कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2020) आजच्या सामन्यात रोस्टन चेसच्या फटकेबाजीनं क्रिकेट चाहत्यांची वाहवाह मिळवली. सेंट ल्युसीआ झौक्स आणि जमैकन थलाव्हास संघामध्ये आजचा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झौक्स संघानं 7 बाद 158 धावांचे आव्हान आंद्रे रसेलच्या थलाव्हास संघासमोर उभे केले. पण, या सामन्यात रोस्टन चेसनं पहिल्यांदाच एक पराक्रम केला.
 
प्रथम फलंदाजी करताना राखहीम कोर्नवॉलनं दोन खणखणीत चौकार मारून सुरुवात केली, परंतु दुसऱ्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर आंद्रे फ्लेचर ( 22) आणि मार्क डेयल (17) यांनी थोडं योगदान दिलं. रोस्टन चेस एका बाजूनं खिंड लढवत होता. नजिबुल्लाह झाद्राननं ( 25) त्याला साथ लाभली, परंतु त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. चेसनं एक बाजू लावून धरताना 42 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 52 धावा केल्या. ट्वें
टी-20 क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. 
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही 
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? 
CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच
"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"
महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ
IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू