Join us  

coronavirus: भारताने ऑस्ट्रेलिया दौरा करायला हवा,  गौतम गंभीरचे मत 

जर भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाचा दौरा केला तर माझ्या मनात बीसीसीआयचा आदर आणखी वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:37 AM

Open in App

मुंबई : सध्याच्या संकटाच्या वेळी भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) नेतृत्व करायला हवे आणि जर या वर्षाच्या शेवटी राष्ट्रीय संघाने आॅस्ट्रेलियाचा दौरा केला तर माझ्या मनात बोर्डाचा आदर आणखी वाढेल, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर क्वारंटाईन होऊ शकतो, असे बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी केलेल्या वक्तव्यावर गंभीर बोलत होता.आॅस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन होणार नसेल तरच द्विपक्षीय मालिकेपूर्वी दोन आठवड्यांच्या विलगीकरणाची गरज भासेल. गंभीर म्हणाला, ‘बीसीसीआयतर्फे हा एक सकारात्मक संकेत आहे. कारण ते एक मोठे चित्र बघत आहेत. त्यामुळे देशाचा माहोल बदलू शकतो. यामुळे केवळ भारतातच नव्हे तर आॅस्ट्रेलियातही सकारात्मक माहोल निर्माण होईल.’ भारतीय संघाला आॅस्ट्रेलिया दौºयात चार कसोटी सामने खेळायचे आहेत. जर हा दौरा झाला नाही तर क्रिकेट आॅस्ट्रेलियाला ३०० मिलियन आॅस्ट्रेलियन डॉलरचे (जवळजवळ १४.७४ अब्ज रुपये) नुकसान होईल.गंभीर म्हणाला, ‘जर भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाचा दौरा केला तर माझ्या मनात बीसीसीआयचा आदर आणखी वाढेल.’ भारतातर्फे ५८ कसोटी आणि १४७ वन-डे सामने खेळणाºया ३८ वर्षीय गौतम गंभीरने यावेळी आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) अलीकडेच जाहीर झालेल्या कसोटी मानांकनावर प्रश्न उपस्थित केला. या मानांकनामध्ये भारताला पिछाडीवर सोडत आॅस्ट्रेलिया अव्वल स्थानी दाखल झाला आहे. गंभीर म्हणाला, ‘नाही, मला आश्चर्य वाटले नाही. कारण माझा या सर्व रँकिंग व अंक प्रणालीवर विश्वास नाही. विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कदाचित सर्वांत खराब गुणांकन पद्धत आहे. तुम्ही गृहमैदानावर सामने जिंका किंवा विदेशात जिंका तुम्हाला सारखे गुण मिळायला हवे. ही गुणांकन पद्धत चुकीची आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यागौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआॅस्ट्रेलिया