Join us

Corona virus : भारतीय क्रिकेटरच्या आईचं कोरोनानं निधन, बहिणीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या सदस्य वेदा कृष्णमूर्तीच्या (Veda Krishnamurthy) आई चेलुवम्बदा देवी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. स्वत: वेदा यांनी शनिवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 09:39 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय महिला क्रिकेट टीमच्या सदस्य वेदा कृष्णमूर्तीच्या (Veda Krishnamurthy) आई चेलुवम्बदा देवी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. स्वत: वेदा यांनी शनिवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

बंगळुरू - देशात आणि राज्यात कोरोना महामारीचं संकट मोठ्या प्रमाणात वाढलं असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन झाले. तर, क्रिकेट विश्वासाठीही दु:खद घटना कोरोनामुळेच घडली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्य वेदा कृष्णमूर्ती यांच्या मातोश्रींचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 

भारतीय महिला क्रिकेट टीमच्या सदस्य वेदा कृष्णमूर्तीच्या (Veda Krishnamurthy) आई चेलुवम्बदा देवी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. स्वत: वेदा यांनी शनिवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून माझ्या बहिनीला कोरोनाची लागण झाली आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमधून सांगितले. 

"आम्माच्या निधनानंतर तुम्ही केलेल्या सांत्वनाबद्दल मी आभारी आहे. आई शिवाय माझ्या कुटुंबाचा विचारही केला जाऊ शकत नाही, हे तुम्ही समजू शकता. तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा सन्मान कराल हीच अपेक्षा आहे. या परिस्थितीमधून जाणाऱ्या सर्वांबद्दल मला संवेदना आहेत.", असे ट्विट वेदा यांनी केलंय. दरम्यान, वेदानं भारतीय महिला क्रिकेटसाठी 47 वन-डे आणि 76 टी20 सामने खेळले आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामृत्यूभारतीय क्रिकेट संघकर्नाटक