Join us

कन्फर्म! स्मृती मानधना प्रख्यात गायकाच्या प्रेमात, प्रियकराने लाईव्ह कंसर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली....

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधना ही तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेचा विषय ठरलेली असते. भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृतीचं नाव हे बऱ्याच काळापासून म्युझिक कंपोझर पलाश मुछाल याच्याशी जोडलं जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:22 IST

Open in App

भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधना ही तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेचा विषय ठरलेली असते. भारतीय संघाची उपकर्णधार असलेल्या स्मृतीचं नाव हे बऱ्याच काळापासून म्युझिक कंपोझर पलाश मुछाल याच्याशी जोडलं जात आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. नात्यासंबंधी चर्चा होत असल्या तरी दोघेही त्याबद्दल काहीही बोललेले नाहीत. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामधून दोघेही नात्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पलाश आणि स्मृतीबाबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पलाश मुछालच्या लाईव्ह कॉन्सर्टचे असल्याचे सांगण्यात येत आहेत. या व्हिडीओमध्ये पलाशने भर मंचावरून स्मृतीवर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पलाश मुछाल स्मृतीवरील प्रेमाची कबुली देताना आय लव्ह यू टू स्मृती असं म्हणताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये म्युझिक कंपोझर पलाशने स्मृती आपली गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले. तसेच तिच्यासाठी एक गाणे देखील गायले. या दरम्यान, पलाश मुछालची बहीण पलक मुछाल हीसुद्धा त्याच्यासोबत उभी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओखाली खास कॅप्शन लिहिण्यात आली आहे. त्यात लिहिले आहे की, पलाशने स्मृतीचं नाव घेतलं यावर माझा विश्वास बसत नाही आहे. शेवटी ४ वर्षे जुन्या नात्यावर शिक्कामोर्तब झालंच. पलाशने आय लव्ह यू टू म्हटलं म्हणजे स्मृतीने आधी प्रपोझ केलं असावं. खरं प्रेम, ज्या प्रकारे एवढ्या प्रेक्षकांसमोर त्याने स्मृतीचा सन्मान केला, ते खूप आवडलं.

याआधी जुलै महिन्यात स्मृती मंधाना बांगलादेश दौऱ्यावर गेली होती. तेव्हा तिचा जन्मदिन साजरा करण्यासाठी पलाशसुद्धा तिथे पोहोचला होता, अशा चर्चा रंगल्या होत्या.  

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघरिलेशनशिप
Open in App