Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची शतकी खेळी; पाक गोलंदाजांना काढले बदडून

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२०च्या लिलावात संघात नव्याने दाखल केरून घेतलेल्या खेळाडूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वादळी शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 18:48 IST

Open in App

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२०च्या लिलावात संघात नव्याने दाखल केरून घेतलेल्या ख्रिस लीनने रविवारी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वादळी शतक झळकावले. लीनने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना बदडून काढले. त्याच्या वादळी शतकाच्या जोरावर लाहोर कलंदर संघाने PSLच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. 

लीनने ५५ चेंडूंत १२ चौकार आणि ८ षटकार खेचून नाबाद ११३ धावा कुटल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर लाहोर कलंदर संघाने मुल्तान सुल्तान संघाचे १८७ धावांचे लक्ष्य पार केले. फाखर जमानने ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

प्रथम फलंदाजी करताना मुल्तान सुल्तान संघाने ६ बाद १८६ धावा केल्या. खुशदिल शाहने २९ चेंडूंत नाबाद ७० धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत ५ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. शान मसूद ( ४२) आणि रवी बोपारा (३३) यांनी हातभार लावला.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2020आॅस्ट्रेलिया