Champions trophy prize money News: कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींचं स्वप्न रविवारी पूर्ण झालं. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीचं सातत्य अंतिम सामन्यातही कायम ठेवलं आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. २५२ धावांचं आव्हान भारताने एक षटक राखून गाठलं. या विजयाबरोबरच भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याबरोबरच भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा विजेता ठरलेल्या भारतीय संघाला जवळपास १९.४८ कोटी रुपये (२.२४ मिलियन डॉलर) मिळाले आहेत. तर उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला ९.७४ कोटी रुपये (१.१२ मिलियन डॉलर) मिळाले आहेत. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेता संघ, उपविजेता आणि इतर संघांना मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम आधीच जाहीर केली होती.
सेमी फायनलमध्ये हरलेल्या संघांना किती कोटी?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांनाही कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाला ४.८७ कोटी रुपये (५,६०,००० डॉलर) मिळाले आहेत. त्याचबरोबर साखळी सामन्यातून बाहेर पडलेल्या संघांनाही भरपूर पैसे मिळाले आहेत.
पाचव्या आणि सहाव्या स्थानी राहिलेल्या संघांना (यात अफगाणिस्तान आणि बांगलादेश) ३,५०,००० डॉलर (३.०४ कोटी रुपये) मिळाले आहेत. तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील (पाकिस्तान आणि इग्लंड) संघांना १,४०,००० डॉलर (१.२२ कोटी रुपये) मिळाले आहेत.
सामना जिंकणाऱ्या संघांवर पैशांचा पाऊस
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्वाचा होता. ग्रुप स्टेजमधील सामना जिंकणाऱ्या संघाला ३४,००० (२९,६१ कोटी रुपये) मिळाले आहेत. याशिवाय सर्व संघांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी १,२५,००० डॉलर (जवळपास १.०८ कोटी रुपये) मिळाले आहेत.
आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारे संघ
१९९८ - दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडिजचा ४ गडी राखून केला होता पराभव
२००० - न्यूझीलंड - भारताचा ४ गडी राखून केला होता पराभव
२००२ - भारत-श्रीलंक संयुक्त विजेतेपद - सामना अनिर्णित राहिला
२००४ - वेस्ट इंडिज - इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव केला होता
२००६ - ऑस्ट्रेलिया - वेस्ट इंडिजचा ८ राखून पराभव केला होता.
२००९ - ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंडचा ६ गडी राखून पराभव केला होता.
२०१३ - भारत - इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला होता.
२०१७ - पाकिस्तान - भारताचा १८० धावांनी पराभव केला होता.
२०२५ - भारत - इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला.