Ind vs NZ final 2025: पाच हजार कोटींच्या सट्ट्याचे डी कंपनीकडून संचालन; नागपूरसह देश-विदेशातील बुकी दुबईत

क्रिकेट जगतासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन ट्रॅफी यावेळी कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते.

By नरेश डोंगरे | Updated: March 10, 2025 00:51 IST2025-03-10T00:50:58+5:302025-03-10T00:51:48+5:30

whatsapp join usJoin us
Champions trophy final 2025 ind vs nz betting | Ind vs NZ final 2025: पाच हजार कोटींच्या सट्ट्याचे डी कंपनीकडून संचालन; नागपूरसह देश-विदेशातील बुकी दुबईत

Ind vs NZ final 2025: पाच हजार कोटींच्या सट्ट्याचे डी कंपनीकडून संचालन; नागपूरसह देश-विदेशातील बुकी दुबईत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-नरेश डोंगरे, नागपूर
Ind vs NZ final 2025 bets: जगभरातील क्रिकेट रसिकांची उत्कंठता ताणून धरणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीच्या महामुकाबल्यावर जगभरातून पाच हजार कोटींचा सट्टा लागला होता. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीने हा सट्टाबाजार संचालित केला होता, अशी माहिती खास सूत्रांकडून पुढे आली आहे.

क्रिकेट जगतासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन ट्रॅफी यावेळी कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार गरम करून हजारो कोटींची उलाढाल करणारे देश-विदेशातील बुकी या सामन्यांवर कमाईचे साधन म्हणून लक्ष ठेवून होते.

विशेष म्हणजे, पकडले जाण्याचे कोणतेही भय नसल्याने नागपूरसह देश-विदेशातील बुकी दुबईतच बसतात. त्यामुळे बुकींचे माहेरघर म्हणूनही सट्टा बाजारात दुबईची ओळख आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम लढत दुबईतच होती. सूत्रांनुसार, देश-विदेशातील बुकी दुबईत बसून लगवाडी, खयवाडी आणि कटिंगची डावबाजी करीत होती आणि डी कंपनी सट्टा बाजाराचे संचालन करीत होती.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य भारताचा सट्टाबाजार नागपूरचे बुकी संचालित करतात आणि येथील बहुतांश बडे बुकी आपापल्या पंटरसह दीड-दोन महिन्यांपासून दुबईतच ठाण मांडून होते. ते तेथूनच नागपूर, गोव्यासह मध्य भारतातील आपल्या पंटर्सकडून खयवाडी करून घेत होते.

ओपनिंग ४०, क्लोजिंग ३०

आंतरराष्ट्रीय बुकींकडून भारतालाच फेवर होता. त्यामुळे भारताचा ओपनिंग रेट ४० पैसे होता. भारतच जिंकणार, असे तमाम सटोड्यांचेही गणित होते. त्यामुळे एकवेळ भारताचा भाव एक पैसाही (न्यूजीलंड जिंकला तर एक हजाराला एक लाख) झाला होता. 

मात्र, एकही विकेट न गमावता न्युझिलंडने अर्धशतक गाठल्याने भारताचे भाव गडगडले होते. त्यानंतर तीन फलंदाज गमावल्यानंतरही भारताचा भाव कमी झाला होता. नंतर मात्र तो ३० पैशांवर स्थिरावला अन् भारतीय संघाने ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

फलोदी बुचकळ्यात!

सट्ट्याचे सर्वाधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी फलोदीचा सट्टा बाजार देश-विदेशात ओळखला जातो. यावेळी मात्र फलोदीचा अंदाजही चुकला. कारण फलोदीने यावेळी भारताचा भाव ७० पैसे तर न्यूझीलंडचा भाव ५० पैसे सांगितला होता. 

अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी न्युझिलँड जिंकणार, असा फलोदीचा अंदाज होता. तो पुर्णपणे चुकीचा ठरला. त्यामुळे सटोडेच नव्हे तर फलोदी बाजारही बुचकळ्यात पडल्याची स्थिती होती.

Web Title: Champions trophy final 2025 ind vs nz betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.