भारतीय संघात 5 स्पिनर का? चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळण्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्मानं दिलं असं उत्तर

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात बोलताना कर्णधार रोहित म्हणाला, ही स्पर्धा ८ वर्षांनंतर होत आहे. आयसीसीचे प्रत्येक विजेतेपद विशेष असते. तुम्ही येथे केवळ जेतेपद जिंकण्याच्या उद्देशानेच येत असता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 22:12 IST2025-02-19T22:11:24+5:302025-02-19T22:12:02+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 Why are there 5 spinners in the Indian team Captain Rohit Sharma gave this answer even before playing the first match of the Champions Trophy india vs bangladesh match | भारतीय संघात 5 स्पिनर का? चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळण्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्मानं दिलं असं उत्तर

भारतीय संघात 5 स्पिनर का? चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळण्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्मानं दिलं असं उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना गुरुवारी (२० फेब्रुवारी) दुबईमध्ये घेळला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच, भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत स्पर्धेतील खेळपट्टी, मैदान आणि भारतीय संघासंदर्भात भाष्य केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात बोलताना कर्णधार रोहित म्हणाला, ही स्पर्धा ८ वर्षांनंतर होत आहे. आयसीसीचे प्रत्येक विजेतेपद विशेष असते. तुम्ही येथे केवळ जेतेपद जिंकण्याच्या उद्देशानेच येत असता. मात्र आमचे लक्ष्य एका वेळी एकाच सामन्यावर केंद्रित करणे आणि तो जिंकणे आहे. यानंतर, पुढची रणनीती तयार करावी लागेल.

टीममधील पाच स्पिनर्ससंदर्भात काय म्हणाला रोहित? -
या स्पर्धेसाठी भारतीय संघात, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या पाच स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे. या स्पिनर्सचा समावेश करण्याच्या प्लॅनसंदर्भात बोलताना रोहित म्हणाला, 'सर्वप्रथम, आमच्याकडे २ स्पिनर आणि ३ ऑलराउंडर आहेत. मी त्यांच्याकडे ५ स्पिनर्स म्हणून बघत नाही. जडेजा, अक्षर आणि सुंदर आपली फलंदाजी भक्कम बनवतात.

या टोर्नामेंटचा यजमान पाकिस्तान आहे. पहिला सामना बुधवारी (१९ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. तर भारतीय संघ गुरुवारी (२० फेब्रुवारी) पहिला सामना खेळणार आहे. हा सामना बांगलादेशविरुद्ध दुबईमध्ये खेळला जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे गट -
गट अ - पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश
गट ब - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...
१९ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
२१ फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
२४ फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२७ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
१ मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
२ मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
४ मार्च - उपांत्य फेरी १, दुबई
५ मार्च - उपांत्य फेरी २, लाहोर
९ मार्च - अंतिम सामना, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळवला जाईल)
१० मार्च - राखीव दिवस

Web Title: Champions Trophy 2025 Why are there 5 spinners in the Indian team Captain Rohit Sharma gave this answer even before playing the first match of the Champions Trophy india vs bangladesh match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.