Champions Trophy 2025 : टीम इंडिया सराव सामना खेळणार; पण...

भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या लढतीनं करणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:37 IST2025-01-09T18:35:50+5:302025-01-09T18:37:53+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 Team India Likely To Play One Warm Up Game In Dubai Ahead Of Champions Trophy 2025 | Champions Trophy 2025 : टीम इंडिया सराव सामना खेळणार; पण...

Champions Trophy 2025 : टीम इंडिया सराव सामना खेळणार; पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Champions Trophy 2025, Team India to Play One Practice Match : क्रिकेट जगतात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे वारे वाहू लागले आहे. या स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे असले तरी भारतीय संघ हायब्रिड मॉडेलनुसार, आपले सर्व सामने दुबईच्या मैदानात खेळणार आहे. जर भारतीय संघ सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहचली तर ते सामनेही दुबईच्या मैदानात खेळवण्यात येतील. या स्पर्धेसंदर्भात आता आणखी एक माहिती समोर आली आहे. २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या लढतीनं भारतीय संघ या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी एक सराव सामनाही खेळणार आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टीम इंडियासह अन्य संघही खेळणार सराव सामना

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,  भारतीय संघाचा एकमेव सराव सामना दुबईत खेळवण्याचा विचार आयसीसी करत आहे. भारतीय संघाशिवाय या स्पर्धेत सहभागी अन्य ७ संघही स्पर्धेआधी किमान एक सराव सामना खेळतील, याचा विचार सुरु आहे. आयसीसीच्या मोठ्या इवेंटमध्ये आयोजित करण्यात येणारे सराव सामने हे अन्य गटातील एखाद्या संघाविरुद्ध खेळवण्यात येतात. त्यामुळे भारतीय संघ आपल्या गटातील पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्याव्यतिरिक्त स्पर्धेतील अन्य चार संघापैकी एका संघासोबत सराव सामना खेळवला जाऊ शकतो.  पण आयसीसीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्लान नेमका कसा असणार ते गुलदस्त्यातच आहे. 

स्टेडियम अपग्रेड पाक क्रिकेट बोर्डाला मिळाली मोठी रक्कम
 
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताशिवाय सर्व सामने हे पाकिस्तानमधील लाहोर, कराची आणि रावळपिंडीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या तिन्ही स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांसह अपग्रेड करण्याचे काम सुरु असून आयसीसी यावर नजर ठेवून आहे. स्टेडियम अपग्रेड करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून १७ बिलियन इतकी रक्कम मिळाली आहे.

१९९६ नंतर पहिल्यांदाच पाकमध्ये रंगणार आयसीसी स्पर्धा

१९९६ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियम अपग्रेडेशनचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले जाईल. १९ फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. पाकिस्तान संघ हा गत विजेता आहे. २०१७ मध्ये भारतीय संघाला पराभूत करत पाक संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती.
 

Web Title: Champions Trophy 2025 Team India Likely To Play One Warm Up Game In Dubai Ahead Of Champions Trophy 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.