Champions Trophy 2025 : रोहितसाठी शेवटची संधी? या स्टार खेळाडूचा पत्ता होणार कट

वनडे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:54 IST2025-01-06T16:50:38+5:302025-01-06T16:54:00+5:30

whatsapp join usJoin us
Champions Trophy 2025 India Squad Big Update Jasprit Bumrah Will Be Vice Captain Sanju Samson Could Be Dropped Report | Champions Trophy 2025 : रोहितसाठी शेवटची संधी? या स्टार खेळाडूचा पत्ता होणार कट

Champions Trophy 2025 : रोहितसाठी शेवटची संधी? या स्टार खेळाडूचा पत्ता होणार कट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Team Big Update For Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभव विसरून टीम इंडियाला आता मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेेत दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. १९ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्धच्या लढतीने या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

रोहित शर्मासाठी शेवटची संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ज्या खेळाडूला संधी दिली जाईल तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल, हे जवळपास निश्चित आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आगामी स्पर्धा रोहित शर्मासाठी शेवटची संधी असू शकते.

बुमराहच्या खांद्यावर गोलंदाजीशिवाय आणखी एक मोठी जबाबदारी

चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात जी माहिती समोर आलीये त्यानुसार, भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच या स्पर्धेत सहभागी होईल. जसप्रीत बुमराह हा वनडे संघाचाही उप कॅप्टन असेल. विराट कोहली आणि शुबमन गिलशिवाय यशस्वी जैस्वाल संघात स्थान मिळणार हे देखील जवळपास निश्चित आहे. 

मोहम्मद शमीसंदर्भातील सस्पेन्स कायम; अर्शदीपची होऊ शकते एन्ट्री

मोहम्मद शमीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियात संधी मिळणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. ज्याच उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. दुसरीकडे गतवर्षी टी-२० क्रिकेटमध्ये विशेष छाप सोडणाऱ्या अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळू शकते.

या स्टार क्रिकेटरचा पत्ता होणार कट

बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी विकेट किपर बॅटरच्या रुपात रिषभ पंत आणि  लोकेश राहुल ही नावेे आघाडीवर आहेत. या अर्थ संजू सॅमसनला संघात एन्ट्री मिळणं मुश्किल आहेे. याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यासारख्या खेळाडूंची टीम इंडियात वर्णी लागेल.

Web Title: Champions Trophy 2025 India Squad Big Update Jasprit Bumrah Will Be Vice Captain Sanju Samson Could Be Dropped Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.