चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघानं प्रतिस्पर्धी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली. अवघ्या ३५ धावांत बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण दोन कॅच सुटले अन् या संधीच बांगलादेशच्या बॅटर्संनी सोनं करून दाखवत संघाच्या धावफलकावर २२८ धावा लावल्या. कर्णधार रोहित शर्मासहहार्दिक पांड्यानं सोपा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिद्धू पाजींनी घेतली रोहित शर्मासहहार्दिक पांड्याची शाळा
कॅच ड्रॉप झालेल्या बॅटरपैकी एकानं अर्धशतक झळकावलं तर दुसऱ्या बांगलादेशी फलंदाजाने शतकी खेळी केली. बांगलादेशच्या फलंदाजांचे कॅच सोडणाऱ्या रोहित शर्माची आणि हार्दिक पांड्याची माजी क्रिकेटर आणि सामन्याचे समोलोचन करणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी शाळाच घेतली. "ऐसे मोको पर तो खूबसूरत मोहतरमा भी नहीं रुकती" अशा शायरीसह सिद्धू पाजींनी दोन्ही स्टार क्रिकेटर्सला टोला मारल्याचे पाहायला मिळाले.
पाक विरुद्ध अशी चूक करू नका, नाहीतर...
बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकात अक्षर पटेलनं बॅक टू बॅक दोन विकेट्स घेतल्या. हॅटट्रिक बॉलवर स्लिमध्ये फिल्डिंगला उभा असलेल्या रोहित शर्मानं जाकर अलीचा एक सोपा कॅच सोडला. हा कॅच एकदम सोपा होता. हार्दिक पांड्यानंही सोपा झेल सोडला. अशी संधी सोडली तर फलंदाज मग मागे वळून पाहत नाही. तो त्याचा फायदा उठवणारच, असे म्हणत सिद्धू पाजींनी बांगलादेशच्या बॅटर्सचे कौतुक करताना भारतीय स्टार्सची शाळा घेतली. समोर बांगलादेशचा संघ आहे. ही चूक २३ फेब्रुवारीला करू नका, नाहीतर खूपच मुश्किल होईल, असे म्हणत त्यांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याचा उल्लेखही केला. पाक विरुद्ध अशी चूक संघासाठी महागडी ठरू शकते, असा सल्लाही सिद्धू पाजींनी भारतीय संघाला दिला आहे.
दोघांनी चांगली खेळी करत सावरला बांगलादेशचा डाव
जाकेर अलीचा कॅच सुटला त्यावेळी तो नुकताच मैदानात आला होता. कॅच ड्रॉफ झाल्यावर मिळालेल्या संधीच सोनं करताना त्याने ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसरीकडे तौहीद हृदय याचा हार्दिक पांड्यानं कॅच सोडला त्यावेळी तो ३९ चेंडूत २४ धावांवर खेळत होता. त्याने शतकी डाव साधला.