Afghanistan vs Australia : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ लाहोरच्या मैदानात उतरला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्लाह शहिदी याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघानं इंग्लंडच्या संघानं ठेवलेले ३५० प्लस धावांचे टार्गेट चेस करत विक्रमी विजय नोंदवला त्या मैदानावर पहिल्यांदा बॅटिंग करून ऑस्ट्रेलियासमोर टार्गेट सेट करण्याचा धाडसी डाव अफगाणिस्तानच्या संघानं खेळला आहे. याआधीच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ३०० पारची लढाई जिंकून अफगाणिस्तानच्या संघानं इतिहास रचला होता. आता ते सेमीच्या उंबरठ्यावर आहेत. यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे चॅलेंज आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अफगाणिस्ताननं का खेळला पहिल्यांदा बॅटिंग करून टार्गेट सेट करण्याचा डाव
अफगाणिस्तान संघाची पहिल्यांदा बॅटिंग करताना विजयी टक्केवारी उत्तम आहे. हा रेकॉर्ड लक्षात घेऊनच संघानं मोठा डाव खेळल्याचे दिसते. पहिल्यांदा फलंदाजी करताना आता ते ऑस्ट्रेलिया समोरकिती धावांचे आव्हान ठेवणार ते बघण्याजोगे असेल. दोन्ही संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरले आहेत. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ समाधानी दिसला. टॉस जिंकला असता तर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच करायचं होतं असं त्याने म्हटले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन- मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅविस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन- रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झाद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी