CEAT cricket awards 2024 : क्रिकेट विश्वातील कलावंत आणि मागील वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बुधवारी मुंबईत पुरस्कार सोहळा पार पडला. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मापासून ते जय शाह यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. बीसीसीआय सचिव जय शाह यांना प्रशासन अन् कारभार उत्कृष्टरित्या सांभाळल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी हा पुरस्कार भारताच्या महिला क्रिकेट संघाला समर्पित केला. CEAT क्रिकेट रेटिंगच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला फिल सॉल्ट, टीम साउदी यांचीही उपस्थिती होती. त्यांनाही सन्मानित करण्यात आले. माजी खेळाडू सुनिल गावस्कर, संजय बांगर, मॅथ्यू हेडन आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारही उपस्थित होते.
तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी देणारा भारताचा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा पुरूष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरचा मानकरी ठरला. क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त करणे हा एक वेगळाच अनुभव आहे. प्रत्येक सामन्यात घेतलेल्या मेहनतीची आणि जिद्दीची ही पावती आहे असे मी समजतो. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी आभारी आहे. या पुरस्कारामुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळत जाईल, असे रोहित शर्माने यावेळी सांगितले.
पुरस्काराचे मानकरी
CEAT जीवनगौरव पुरस्कार - राहुल द्रविड
पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर - रोहित शर्मा
वन डे बॅट्समन ऑफ द इयर - विराट कोहली
वन डे बॉलर ऑफ द इयर - मोहम्मद शमी
टेस्ट बॅट्समन ऑफ द इयर - यशस्वी जैस्वाल
टेस्ट बॉलर ऑफ द इयर - आर अश्विन
ट्वेंटी-२० बॅट्समन ऑफ द इयर - फिल सॉल्ट
ट्वेंटी-२० बॉलर ऑफ द इयर - टीम साउदी
डॉमेंस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर - साई किशोर
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर - स्मृती मानधना
महिला बेस्ट बॉलर ऑफ द इयर - दीप्ती शर्मा
स्मृतीचिन्ह - ट्वेंटी-२० इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारी कर्णधार - हरमनप्रीत कौर
IPL साठी लीडरशीर अवॉर्ड - श्रेयस अय्यर
स्मृतीचिन्ह - कसोटीमध्ये सर्वात जलद द्विशतक - शेफाली वर्मा
क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार - जय शाह