Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील ट्वेन्टी-20 सामन्यावर कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान

आता या वाद-विवादामध्ये भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने उडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 19:06 IST

Open in App

मुंबई : दिल्लीमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये 3 नोव्हेंबरला पहिला ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी बीसीसीआयकडे बऱ्याच जणांनी केली आहे. आता या वाद-विवादामध्ये भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माने उडी घेतली आहे.

आज बांगलादेशच्या संघाने स्टेडियममध्ये कसून सराव केला. सराव करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी मास्क लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिल्लीमध्ये एकही सामना खेळवू नये, असे मत व्यक्त केले होते. आता या सामन्याबद्दल रोहित शर्माने एक मोठे विधान केले आहे.

यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना याच मैदानात खेळवण्यात आला होता. आता बांगलादेशबरोबर ट्वेन्टी-20 सामनाही होणार आहे. या सामन्याबद्दल रोहित म्हणाला की, " भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना या मैदानात यशस्वीपणे खेळवला गेला होता. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धचा सामनाही यशस्वीपणे पार पडेल. हा सामना खेळताना आम्हाला कोणतीही समस्या जाणवणार नाही."

दिल्लीमध्ये कोणताही सामना खेळू नका; दिल्लीकर माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्यमुंबई : दिल्लीमध्ये कोणताही सामना खेळू नका, असे खळबळजनक वक्तव्य दिल्लीच्याच एका माजी क्रिकेटपटूने केले आहे. त्यामुळे खरंच दिल्लीमध्ये आता सामना खेळवायचा की नाही, याचा विचार बीसीसीआयला पुन्हा एकदा करावा लागणार आहे. 

पर्यावरण तज्ज्ञांनी मंगळवारी दिल्लीमध्ये सामना खेळवला जाऊ नये, असे पत्र बीसीसीआयला पाठवले होते. त्यामुळे या सामन्याबाबत संदिग्धता होती. पण आता तर दिल्लीच्या वातावरणाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना आता संकटात सापडला असल्याचे म्हटले जात होते.

याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की, " जोपर्यंत दिल्लीमधील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत कोणत्याही सामन्याचे आयोजन येथे करू नये. कोणतीही स्पर्धा किंवा सामना दिल्लीच्या जनतेपेक्षा मोठा नाही. प्रदूषणामुळे दिल्लीची जनता हैराण आहे. पहिल्यांदा प्रदूषण कमी करा आणि त्यानंतर सामने खेळवा, अशी माझी भूमिका आहे."

टॅग्स :रोहित शर्मागौतम गंभीरभारत विरुद्ध बांगलादेश