आला रे आला, हार्दिक आला! देवाची पूजा करून पांड्याने Mumbai Indians ची सूत्र घेतली हाती

हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 09:58 AM2024-03-12T09:58:38+5:302024-03-12T09:59:00+5:30

whatsapp join usJoin us
Captain Hardik Pandya joins Mumbai Indians ahead of IPL 2024, performs puja in dressing room, Video  | आला रे आला, हार्दिक आला! देवाची पूजा करून पांड्याने Mumbai Indians ची सूत्र घेतली हाती

आला रे आला, हार्दिक आला! देवाची पूजा करून पांड्याने Mumbai Indians ची सूत्र घेतली हाती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya joins Mumbai Indians ( Marathi News ) - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सर्व उत्सुक असतील ते मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी होते, हे पाहण्यासाठी. कारण, गेली अनेक वर्ष ज्या रोहित शर्माकडे Mumbai Indians चे नेतृत्व होतं, तो या पर्वात फक्त एक फलंदाज म्हणून मैदानावर असणार आहे. MI फ्रँचायझीने ट्रेडिंग विंडोमध्ये गुजरात टायटन्सच्या हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्तात पुन्हा घेतले आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. २२ मार्चपासून आयपीएल २०२४ ला सुरुवात होतेय आणि पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू भिडणार आहेत.  


मुंबई इंडियन्सही नव्या सुरुवातीसाठी सज्ज झाले आहेत आणि हार्दिकने संघाच्या नेतृत्वाची सूत्र काल हाती घेतली. फ्रँचायझीने हार्दिकच्या स्वागताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात हार्दिक मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांची गळाभेट घेताना दिसतोय आणि त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्याने देवाची पूजा केल्याचे पाहायला मिळतेय. हार्दिकने आयपीएल २०२२च्या पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सला जेतेपद पटकावून दिले आणि गेल्या वर्षीही त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने अंतिम फेरी गाठली होती.  


 
हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले.   
यापूर्वी 'स्टार स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीत पांड्याने विविध बाबींवर प्रकाश टाकला. तो म्हणाला की, मुंबईच्या चाहत्यांकडून एवढं प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं आभार मानण्यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत. मुंबई माझं घर आहे, मी बडोद्यातून इथं आलो अन् स्वप्नपूर्तीकडं वाटचाल केली. या आधी मुंबईच्या संघात होतो, पण २ वर्ष बाहेर गेलो होतो. मात्र आता घरवापसी झाली असून मुंबईच्या संघानेच मला ओळख दिली. २०१५ मध्ये आयपीएलमध्ये 'करा किंवा मरा' अशा लढतींमध्ये मी चांगली कामगिरी केली. इथूनच माझ्या क्रिकेट प्रवासाची खरी सुरूवात झाली. 

Web Title: Captain Hardik Pandya joins Mumbai Indians ahead of IPL 2024, performs puja in dressing room, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.