Ruturaj Gaikwad And Prithvi Shaw In Maharashtras Squad : मुंबईची साथ सोडल्यावर पृथ्वी शॉ नव्या संघासोबत पहिली स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईकर सलामीवीर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच महाराष्ट्र संघाकडून मैदानात उतरणार आहे. अखिर भारतीय बुची बाबू निमंत्रित स्पर्धेसाठी १७ सदस्यीय महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आलीये. या संघात पृथ्वी शॉची वर्णी लागली असून ऋतुराज गायकवाड संघात असला तरी त्याला कॅप्टन्सी दिलेली नाही. जाणून घेऊयात त्यामागचं कारण अन् कुणा कुणाला संघात स्थान मिळालंय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऋतुराज गायकवाड ऐवजी या चेहऱ्याच्या खांद्यावर पडली कॅप्टन्सीची जबाबदारी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाड हा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले आहे. IPL मध्येही तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसलाय. पण आगामी बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्र संघाने त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याऐवजी अंकित बावणेला पसंती दिलीये. १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड फक्त एक सामनाच खेळणार आहे. कारण दुलीप करंडक स्पर्धेत तो पश्चिम विभाग संघात आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघाने त्याच्याऐवजी कॅप्टन्सीत दुसरा पर्याय शोधला आहे.
पृथ्वी शॉची नवी इंनिंग
टीम इंडियाचे प्रतिनीधत्व करणारा पृथ्वी शॉ याआधी मुंबई संघाकडून खेळताना दिसला होता. गत हंगामात कामगिरीतील सातत्याचा अभाव अन् फिटनेसचा मुद्द्यावरून त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले नव्हते. आता २५ वर्षीय खेळाडूनं ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबईची साथ सोडून महाराष्ट्राचा संघ निवडला आहे. नवी सुरुवात तो धमाक्यात करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
असा आहे महाराष्ट्राचा संघ
अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धास, अर्शिन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवले (विकेटकीपर/बॅटर), मंदार भंडारी (विकेटकीपर/बॅटर), रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाधे, विक्की ओस्तवाल, हितेश वालुंज, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर.