Join us  

IPL 2020 : डीन जोन्स यांना वाचविण्याचा ब्रेट ली याने केला होता खूप प्रयत्न

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones) यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 5:32 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones) यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ५९ वर्षांचे असलेले जोन्स Indian Premier League (IPL 2020) समालोचनासाठी भारत दौºयावर आले होते. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बायो सिक्युर बबलमध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. ज्यावेळी जोन्स यांना हृदविकाराचा झटका आला, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि त्यांचा सहकारी समालोचक ब्रेट ली (Brett Lee) जोन्स यांच्या सोबत होता. त्यावेळी लीने अखेरपर्यंत जोन्स यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. IPL 2020 Updates

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल

जोन्स यांच्या अचानक जाण्याने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार ली याने जोन्स यांचा जीव वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. जोन्स यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटतज्ज्ञ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलसाठी समालोचक म्हणून त्यांना करारबद्ध करण्यात आले होते. भारतात त्यांचे अनेक चाहते असून त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.मेलबर्न येथे जन्म झालेल्या जोन्स यांनी आॅस्टेÑलियाकडून ५२ कसोटी सामने खेळताना ४६.५५ च्या सरासरीने ३,६३१ धावा फटकावल्या. २१६ धावांची खेळी त्यांची सर्वोत्तम ठरली. दिग्गज कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांच्या संघातील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू असलेल्या जोन्स यांनी एकूण ११ शतकी खेळी केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्येही छाप पाडलेल्या जोन्स यांनी १६४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळताना ७ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ६,०६८ धावा काढल्या. IPL 2020 Updates

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका

ऑस्ट्रेलियाच्या मीडीयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी जोन्स यांना हृदयाचा झटका आला, तेव्हा त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी ली याने खूप प्रयत्न केले. ब्रेकफास्ट केल्यानंतर हॉटेल लॉबीमध्येच जोन्स यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. त्यावेळी त्यांच्यासोबत ब्रेट लीही होता. जोन्स यांच्या जाण्याने क्रिकेटविश्व हळहळले. आयपीएल सामन्यातही खेळाडूंनी आपल्या हातावर काळीपट्टी बांधून जोन्स यांना श्रद्धांजली दिली. 

विराट कोहलीनं सामना तर गमावलाच शिवाय 12 लाखांचा दंडही भरावा लागला, जाणून घ्या कारण

 

टॅग्स :IPL 2020आॅस्ट्रेलिया