BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर

ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 14:03 IST2019-01-01T13:54:42+5:302019-01-01T14:03:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BREAKING: Direct qualifiers for ICC Men's T20 World Cup 2020 confirmed | BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर

BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर

दुबई : ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केली. 31 डिसेंबर 2018च्या आयसीसी ट्वेंटी-20 क्रमवारीनुसार हे संघ ठरवण्यात आले आहेत. पात्रतेच्या निकषानुसार यजमान ऑस्ट्रेलिया आणि अन्य नऊ संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. त्यातील अव्वल आठ संघ थेट सुपर 12 मध्ये खेळतील, तर उर्वरित दोन संघ अन्य सहा संघांसह साखळी फेरीत खेळतील. हे अन्य सहा संघ पात्रता फेरीतील असतील. 



आयसीसीच्या ट्वेंटी-20 क्रमवारीनुसार पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांनी सुपर 12 संघांत थेट प्रवेश मिळवला आहे. माजी विजेते आणि तीन वेळचे उपविजेते श्रीलंका व बांगलादेश यांना साखळी फेरीत खेळावे लागणार आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. 

श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने संघाला सुपर 12 मध्ये प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे, परंतु त्याने साखळी फेरीत दमदार कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन यानेही सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

Web Title: BREAKING: Direct qualifiers for ICC Men's T20 World Cup 2020 confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.