Bob Simpson The Former Australian Captain And Coach Passed Away : ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार आणि कोच बॉब सिम्पसन (Bob Simpson) यांचे शनिवारी सिडनी येथे निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दिग्गजाने फक्त खेळाडू आणि कॅप्टनच्या रुपातच नाही तर कोचच्या रूपातही ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ॲलन बॉर्डर (Allan Border) यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने १९८७ मध्ये पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. भारतीय मैदानातील या अविस्मरणीय विजयात हाच चेहरा पडद्यामागचा हिरो होता. त्यावेळी ते ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण, २० हजारपेक्षा अधिक धावा
सिम्पसन यांनी आपल्या कारकिर्दीत १९५७ ते १९७८ या कालावधीत ६२ कसोटी सामने खेळले. यात १० शतके आणि २७ अर्धशतकाच्या मदतीने त्यांनी ४८६९ धावा केल्या. फलंदाजीशिवाय गोलंदाजीत त्यांच्या खात्यात ७१ विकेट्सची नोंद आहे. ते स्लिपमधील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक होते. वयाच्या १६ व्या वर्षी न्यू साउथ वेल्सकडून क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दिग्गजाने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत २१,०२९ धावा आणि ३४९ विकेट्स घेतल्या आहेत.
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
निवृत्ती घेतल्यावर १० वर्षांनी पुन्हा उतरले मैदानात, तेही...
कसोटी कारकिर्दीत ५० सामने खेळल्यावर १९६८ मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत असल्याचे पाहून त्यांनी आपला निर्णय मागे घेत पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. कमबॅक करताना ते कॅप्टनच्या रुपात पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना दिसले. त्यांनी कसोटी कारकिर्दीत जी १० शतके मारली ती सर्व संघाचे नेतृत्व करतानाच आली.
कमजोर कांगारुंना विश्व चॅम्पियन करुन दाखवलं
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने क्रिकेट जगतात सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकून आपला दबदबा दाखवून दिलाय. पण १९८० मध्ये या संघाची अवस्था एकदम बिकट होती. बॉब सिम्पसन प्रशिक्षकपदी आले अन् त्यांनी खेळाडूंच्या फिटनेस फोकस केला. क्षेत्ररक्षणावर विशेष भर देत असताना युवा खेळाडूंसह संघ बांधणी करत त्यांनी कमजोर झालेल्या संघाला बळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यावेळी स्टी वॉ हे त्यांनी हेरलेल्या युवा खेळाडूपैकी एक नाव होते. भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांसह योग्य रणनिती आखली अन् संघाला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
Web Title: Bob Simpson The Former Australian Captain And Coach Passed Away At Age Of 89
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.