Join us  

...तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या; खासदार गंभीरची जोरदार 'बॅटिंग'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 8:30 PM

Open in App

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. मात्र मला शिव्या देऊन दिल्लीतील प्रदूषण कमी होत असे तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या असं म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना गंभीरने ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

दिल्लीतील हवेचा प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस विषारी होत चालला आहे. यासाठी दिल्ली सरकारने राज्याचे सर्व खासदार व एमसीडी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र गौतम गंभीरभारत विरुद्ध बांगलादेशच्या कसोटी साम्यात समालोचनची भूमिका निभावतो आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मण आणि निवेदक जतिन सप्रू यांच्यासोबत इंदूरमध्ये जिलेबीवर ताव मारतानाचा गंभीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले होते.

गौतम गंभीर म्हणाला की, मी माझ्या मतदारसंघ व शहरातील अनेक काम केली आहेत. त्यामध्ये गाजीपूरमधील कचरा हटविणे, ईडीएमसी शाळेमध्ये डिजिटल वर्ग तयार करणे तसेच महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावणे किंवा गरीबांसाठी मोफत जेवणाची सोय करणे यांसारखी काम मी केली असल्याचे गौतम गंभीरने सांगितले. त्याचप्रमाणे पूर्व दिल्लीमधील कार्यालयात मी सकाळी 11 वाजता जातो व लोकांच्या समस्या जाणून घेतो असं गंभीरने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

दरम्यान, दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. तर, केंद्र सरकारच्या वायू गुणवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थेने हवेची गुणवत्ता खराब होण्यासाठी हवामानामध्ये होणारे बदल कारणीभूत असल्याचा दावा केला होता. 

टॅग्स :गौतम गंभीरदिल्ली प्रदूषणभारत विरुद्ध बांगलादेशभाजपा