BCCI ची घोडचूक! रोहितचं श्रेय गिलला; चाहत्यांचा संताप! नेमकं काय घडलं?”

चूक बीसीसीआयची अन् ट्रोल झाला गिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:46 IST2026-03-16T11:45:20+5:302026-03-16T11:46:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Big Mistake In BCCI Awards 2026 Showing Shubman Gill Champions Trophy Winning Captain Rohit Sharma Fans Angry | BCCI ची घोडचूक! रोहितचं श्रेय गिलला; चाहत्यांचा संताप! नेमकं काय घडलं?”

BCCI ची घोडचूक! रोहितचं श्रेय गिलला; चाहत्यांचा संताप! नेमकं काय घडलं?”

Big Mistake In BCCI Naman Awards 2026 : बीसीसीआय नमन पुरस्कार २०२६ च्या खास कार्यक्रमात रविवारी  क्रिकेटमधील योगदान आणि सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या आजी-माजी क्रिकेटर्संना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय आणि पुरुष संघासह ICC ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधारांचा खास सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्मा मात्र दिसला नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

चूक बीसीसीआयची अन् ट्रोल झाला गिल

बीसीसीआयने बदलाची गरज नसताना वनडेत रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला नवा कॅप्टन केले. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देऊन रोहित शर्माबाबत जे घडलं ते चुकीच आहे, अशी चर्चाही रंगली आता त्यात बीसीसीआयने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मोठी चूक केली आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच श्रेय चक्क शुभमन गिलला देण्यात आले. ही गोष्ट रोहित शर्माच्या चाहत्यांना चांगलीच खटकली असून या मुद्यावरुन चाहते बीसीसीआयवर चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावर तशा प्रतिक्रिया उमटत आहेत..  BCCI च्या चुकीमुळे काहीजण तर शुभमन गिललाही ट्रोल करत आहेत. BCCI च्या पुरस्कार सोहळ्यात असं नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

BCCI Naman Awards 2026: द्रविड-मिताली-बिन्नींच्या शिरेपेचात मानाचा तुरा; पाहा विजेत्यांची यादी

बीसीसीआय पुरस्कार सोहळ्या दरम्यान नेमकं काय घडलं?



शुभमन गिलला गत वर्षातील दमदार कामगिरीच्या जोरावर पॉली उमरीगर पुरस्कार प्रदान करण्यात आला. एवढेच नाही तर ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांपैकी रोहित शर्मा अनुपस्थितीत असल्यामुळे त्याच्या जागीही शुभमन गिल व्यासपीठावर आला. ज्यावेळी गिलला स्क्रिनवर दाखवण्यात आले त्यावेळी गाफ्रिक्समध्ये त्याच्यासमोर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार असा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. पण ही स्पर्धा भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्यामुळे ही गोष्ट रोहितचं श्रेय गिलला देण्यातील प्रकार आहे. BCCI ची ही चूक रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकली आहे. या गोष्टीवरून काहींनी शुभमन गिललाही ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. 

२०२७ चा वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य

शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना बीसीसीआय नमन पुरस्कार २०२६ च्या सोहळ्यात सर्वोत्तम आंतरारष्ट्रीय क्रिकेटरच्या (पुरुष आणि महिला) रुपात सन्मानित करण्यात आले. गिलने प्रतिष्ठित पॉली उमरीगर पुरस्कार जिंकला. या सोहळ्यात भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की,  २०२३ च्या हंगामातील वनडे वर्ल्ड कप उंचावण्याची संधी हुकली. पण पुढच्या वेळी ताकदीनिशी मैदानात उतरुन कप जिंकू.
 

Web Title : बीसीसीआई की चूक: रोहित का श्रेय गिल को देने पर प्रशंसकों का गुस्सा!

Web Summary : बीसीसीआई ने नमन पुरस्कार 2026 में रोहित शर्मा की चैंपियंस ट्रॉफी जीत का श्रेय गलती से शुभमन गिल को दे दिया। प्रशंसक गुस्से में हैं और इस गलती के लिए गिल को ट्रोल कर रहे हैं। रोहित कार्यक्रम में अनुपस्थित थे जहाँ गिल को पॉली उमरीगर पुरस्कार मिला और उन्होंने 2027 विश्व कप जीतने के बारे में बात की।

Web Title : BCCI's blunder: Crediting Rohit's win to Gill sparks fan outrage!

Web Summary : BCCI wrongly credited Shubman Gill with Rohit Sharma's Champions Trophy win at Naman Awards 2026. Fans are furious, trolling Gill for the error. Rohit was absent from the event where Gill received the Poly Umrigar award and spoke about winning the 2027 World Cup.