Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल; धडाकेबाज फलंदाजाची झाली एंट्री

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज खेळणार नसला तरी निवड समितीने त्याच्याबदली एका फलंदाजाला संधी दिल्यामुळे काही जणांनी भुवया उंचावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:43 IST

Open in App

मुंबई : भारताविरुद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात मोठा बदल केलेला पाहायला मिळत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात तीन एकदविसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात धडाकेबाज फलंदाजाला एंट्री देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने आज भारताविरुद्धच्या संघात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शीन अॅबॉट हा दुखापतग्रस्त झाला आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे आता त्याला चार आठवडे सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या संघात ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने बदल केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज खेळणार नसला तरी निवड समितीने त्याच्याबदली एका फलंदाजाला संधी दिल्यामुळे काही जणांनी भुवया उंचावल्या आहेत. पण भारतातील खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

शीन दुखापतीमुळे संघाच्या बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या संघात डॉसी शॉर्टला स्थान देण्यात आले आहे. शॉर्ट हा एक धडाकेबाज फलंदाज आहे. ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने धडाकेबाज फलंदाजी केली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या संघात त्याला स्थान देण्यात आले आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारत