Join us

ऐकावं ते नवलच ; ट्वेंटी-20 लीगमध्ये फायनलसाठी पाच संघ ठरणार पात्र

ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं बिग बॅश लीगच्या 2019-20च्या हंगामासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार आता अंतिम फेरीतील प्रवेशासाठी चार नव्हे, तर पाच संघांना संघी मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 18:21 IST

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं बिग बॅश लीगच्या 2019-20च्या हंगामासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार आता अंतिम फेरीतील प्रवेशासाठी चार नव्हे, तर पाच संघांना संघी मिळणार आहे. या नव्या फॉरमॅटनुसार गुणतालिकेत अव्वल दोन संघांना फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त संधी मिळणार आहे. फायनलसाठीची चुरस 30 जानेवारी 2020 ला सुरु होईल आणि 8 फेब्रुवारी 2020ला अंतिम विजेता ठरेल. पाच संघांमध्ये एलिमिनेटर, क्वालिफायर, नॉक आउट, चॅलेंजर आणि फायनल असे सामने होतील. 

नव्या फॉरमॅटनुसार गुणतालिकेत चौथ्या व पाचव्या स्थानावरील संघ थेट एलिमिनेटर सामना खेळेल आणि तो 30 जानेवारीला होणार. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघात क्वालिफायर सामना होईल. एलिमिनेटर सामन्यातील विजेता नॉक आउट सामन्यात तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी भिडेल. त्यानंतर चॅलेंजर सामन्यात क्वालिफायर संघातील पराभूत संघ आणि नॉकआउट सामन्यातील विजेता यांच्यात चुरस रंगेल. त्यानंतर चॅलेंजरमधील विजेता आणि क्वालिफायरमधील विजेता यांच्यात अंतिम सामना होईल.

17 डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि सलामीच्या लढतीत ब्रिसबन हिट आणि सिडनी थंडर्स हे भिडतील. 42 दिवसांच्या या स्पर्धेत 56 सामने खेळवण्यात येतील.

अशी असेल फायनलसाठीची चुरस

 

टॅग्स :टी-20 क्रिकेटआॅस्ट्रेलिया