Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुवनेश्वर कुमारने अखेर केला खुलासा, नुपूर नागर आहे त्याची 'बेटर हाफ'

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार अनेकदा फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने आश्चर्यचकित करताना दिसतो. मैदानावर फलंदाजांची फिरकी घेणा-या भुवनेश्वर कुमारने आपल्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:35 IST

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार अनेकदा फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने आश्चर्यचकित करताना दिसतो. मैदानावर फलंदाजांना यॉर्कर टाकत सतावणा-या भुवनेश्वर कुमारने आपल्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलंय. भुवनेश्वर कुमारने आपल्या फेसबूक पेजवर एक फोटो अपलोड केला होता. 'डिनर डेट' अशी कॅप्शन दिलेल्या या फोटोमधील समोरच्या तरुणीचा चेहरा भुवनेश्वर कुमारने क्रॉप केला होता. त्यावेळी आपण लवकरच पुर्ण फोटो अपलोड करु असंही त्याने सांगितलं होतं. यानंतर अनेकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली होती. काहीजणांनी ती तरुणी अभिनेत्री अनुस्मृति सरकार असल्याचा दावा केला होता. मात्र भुवनेश्वर कुमारने सर्व अंदाज फेटाळून लावले होते. 

भुवनेश्वर कुमारने आता पुर्ण फोटो अपलोड केला आहे. यावेळी त्याने फोटोमध्ये आपली 'बेटर हाफ' नुपूर नागर असल्याचा खुलासाही केला आहे. भुवनेश्वर कुमारने याशिवाय दुसरी माहिती दिलेली नाही. मात्र चाहत्यांना दिलेला शब्द पाळत पुर्ण फोटो अपलोड केला आहे. आता लवकरच भुवनेश्वर आपल्या लग्नाचाही तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. नुकताच भारतीय क्रिकेटर युवराज सिंग अभिनेत्री हेजलसोबत विवाहबंधनात अडकला आहे. याशिवाय झहीर खान आणि सागरिका घोष यांचा 27 नोव्हेंबरला विवाहसोहळा पार पडणार आहे. 

भुवनेश्वर कुमार भारतीय क्रिकेट संघातील महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. डेथ ओव्हरमधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणूनही भुवनेश्वर कुमारला ओळखलं जातं. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या गेलेल्या भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान देण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भुवनेश्वरने पाच विकेट्स घेतले. आता ऑस्ट्रेलियाविरोधात टी-20 सामन्यांच्या मालिकेतही भुवनेश्वर खेळताना दिसेल. 

हार्दिक पांड्याने 'त्या' रहस्यमय मुलीसोबतचं नातं केलं उघड; चर्चेला पूर्णविराम

हार्दिक पांड्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटो त्याच्यासोबत असलेली ही मुलगी कोण? असा प्रश्न ट्विटर युजर्संना पडला होता. अनेकांनी तिला 'मिस्ट्री गर्ल' असंही नाव दिलं आहे. हार्दिक पांड्याचा त्या मुलीसोबतचा फोटो एका वेबसाइटने ट्विटरवर पोस्ट केला होता. तेव्हापासून हार्दिक पांड्या आणि फोटोतील ती मुलगी चर्चेचा विषय झाला होत. अखेर हार्दिकने स्वतः त्या मुलीसोबतच्या नात्याचा खुलासा केला. हार्दिक पांड्याने ट्विटरवर त्या मुलीसोबतचा फोटो शेअर करून मिस्ट्री सोडवली. ती मुलगी माझी बहीण आहे, असं कॅप्शन त्या फोटोला दिलं  फोटोतील ती मुलगी बहिण असल्याचं हार्दिकने सांगितलं त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ