ठळक मुद्देक्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हार्दिकसोबत फोटोमध्ये असलेली ही मुलगी कोण? असा प्रश्न ट्विटर युजर्संना पडला होता.

मुंबई- क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हार्दिकसोबत फोटोमध्ये असलेली ही मुलगी कोण? असा प्रश्न ट्विटर युजर्संना पडला होता. अनेकांनी तिला 'मिस्ट्री गर्ल' असंही नाव दिलं आहे. हार्दिक पांड्याचा त्या मुलीसोबतचा फोटो एका वेबसाइटने ट्विटरवर पोस्ट केला होता. तेव्हापासून हार्दिक पांड्या आणि फोटोतील ती मुलगी चर्चेचा विषय आहे. आता हार्दिकने स्वतः त्या मुलीसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे.

हार्दिक पांड्याने ट्विटरवर त्या मुलीसोबतचा फोटो शेअर करून मिस्ट्री सोडवली आहे. ती मुलगी माझी बहीण आहे, असं कॅप्शन त्या फोटोला दिलं आहे. फोटोतील ती मुलगी बहिण असल्याचं हार्दिकने सांगितलं त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पंड्याच्या या ट्विटला 3200 पेक्षा जास्त युजर्सने रिट्विट केलं आहे तसंच 10 हजार पेक्षा जास्त लाइक्स त्याच्या ट्विटला आहेत.


गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या या फोटोमुळे सगळीकडे चर्चेचा विषय होता. hardikpandya_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक आणि त्या मुलीचा फोटो आला होता. तेव्हापासून हार्दिकसोबतच्या त्या मुलीला मिस्ट्री गर्ल नावाने बोललं जात होतं. अनेकांनी या फोटोवर कमेंट करून विविध प्रश्न विचारले. फोटोतील ही मुलगी आमची होणारी वहिनी आहे का ? असा प्रश्नही विचारला होता. पण या सगळ्या प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचं नाव एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. त्यावरूनही अनेक चर्चा झाली. पण हार्दिक कोलकात्यामधील एका 22 वर्षीय मॉडेलला गेल्या काही वर्षापासून डेट करत असल्याचं बोललं जातं आहे. हार्दिक पांड्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे जरी चर्चेत असला तरी खूप कमी वेळेत त्याने टीम इंडियातील सगळ्यात आवडता खेळाडू म्हणून त्याची ओळख बनविली आहे. त्याच्या खेळामुळे सगळीकडूनच त्याचं कौतुक होत असतं.