Join us

'भज्जीचा दुसरा' - ऑस्ट्रेलिया नव्हे श्रीलंकन संघच खेळतोय पिवळी जर्सी घालून 

पाच वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवत मालिका खिशात घातली. भारताविरोधातील या पराभवनंतर ऑस्ट्रेलियावर चारी बाजूनं टीका होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:40 IST

Open in App

नवी दिल्ली - पाच वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवत मालिका खिशात घातली. भारताविरोधातील या पराभवनंतर ऑस्ट्रेलियावर चारी बाजूनं टीका होत आहे. यामध्ये आता भारतीय गोलंदाज हरभजन सिंगची भर पडली आहे.  सध्याच्या ऑस्ट्रेलियाच्या संधाचा खेळ पाहून असं वाटतय की, श्रीलंकन संघ पिवळी जर्सी घालून खेळतोय. याआधी मी कधीच ऑस्ट्रेलियन संघाला असा खेळ करताना पाहिलं नाही. मी जेवढा विराट आणि त्याच्या संघाला ओळखतो त्यावरून ते नक्कीच व्हाईटवॉश देण्याचा विचार करत असतील असे म्हणत हरभजन सिंगने कठोर शब्दात ऑस्ट्रलियन संघावर टीका केली आहे.

भारतानं पाच सामन्याच्या मालिका खिशात घातली असली तरी शेवटच्या दोन सामन्यासाठी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना अंतिम 11 जणांमध्ये कायम ठेवायला पाहिजे असा सल्ला हरभजन सिंगनं विराट कोहली आणि रवि शास्त्रींना दिला आहे. कुलदीप और चहल हे मॅच विनर गोलंदाज आहेत. दोघेही चेंडू फ्लाइट करण्यात माहिर आहेत. फलंदाजया दोघांचे चेंडू खेळाताना अडखळतात.  

ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथा वन-डे सामना 28 सप्टेंबरला बंगळुरुत होणार आहे. तर शेवटचा सामना 1 ऑक्टोबरला नागपूरमध्ये होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला व्हाईटवॉश देण्याची संधी विराटच्या संघाला असणार आहे. तर दोन्ही सामन्यात भारताचा पराभव करत लाज राखण्याचा प्रयत्न कांगारु करतील. 

....तर भारतीय संघ 10 पैकी 9 वेळा हरवेल  - अॅरॉन फिंच

सध्याच्या घडीला भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघामध्ये बरेच अंतर असून, भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे. ऑस्ट्रेलियन सलामीवीर अॅरॉन फिंचने प्रसारमाध्यमांशी बोलताना ही कबुली दिली. पहिल्या तीन सामन्यांमध्ये आम्ही चांगल्या संधी होत्या. पण भारताला थोडासा जरी चान्स मिळाला तर ते तुम्हाला 10 पैकी 9 वेळा पराभूत करतील असेही तो म्हणाला. इथल्या वातावरणात भारताविरुद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला 100 टक्के खेळ करावा लागेल. तुम्ही तुमच्या क्षमतेच्या 90 टक्के खेळ करुन भागणार नाही असे फिंचने सांगितले. प्रत्येक संघ परदेशात जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तुम्ही पराभूत होत असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो असे फिंचने सांगितले. 

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने केले भारतीय गोलंदाजांचे कौतुक स्टीव्ह स्मिथने जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारवर स्तुतीसुमने उधळली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. त्यानंतर या सामन्याबद्दल बोलताना स्मिथनं बुमराह व भुवनेश्वर हे सर्वोत्कृष्ट डेथ बोलर्स आहेत असं कौतुक केलं आहे. भारताची गोलंदाजीही चांगली झाली. मला वाटतं, शेवटच्या महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणारे बुमराह व भुवनेश्वर कुमार सध्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. विशेषत: विकेट जर मंदावत असेल तर या दोघांना खेळणं अवघड असतं," असे उद्गार स्मिथने काढले आहेत.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया