Join us

बाद फेरीत Mohammed Shami ची नाबाद खेळी! गोलंदाजानं पेश केला तुफानी फटकेबाजीचा नजराणा (VIDEO)

त्याच्या या खेळीच्या जोरावर बंगालच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:35 IST

Open in App

Bengal vs Chandigarh, Pre Quarter Final 1 :  सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगाल विरुद्ध चंदीगड यांच्यातील उपउपांत्यपूर्व सामना रंगला आहे. या सामन्यात बंगालच्या ताफ्यातून खेळणाऱ्या भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद शमीनं आपल्या भात्यातील बॅटिंगचा खास नजराणा पेश केला.  

मोहम्मद शमीचा बॅटिंगमध्ये जलवा, १७ चेंडूत कुटल्या नाबाद ३२ धावा

 

तळाच्या फलंदाजीत शमीनं केली तुफान फटकेबाजी 

चंदीगडच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर अभिषेक पोरेल आणि करन लाल यांनी बंगालच्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर करण लालच्या २५ चेंडूतील ३३ धावांची खेळी वगळता आघाडीच्या फलंदाजीत एकालाही मोठी खेळी करता आली नाही. तळाच्या फलंदाजीत मोहम्मद शमीनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.

बंगालच्या संघातील बॅटरला जमलं  नाही ते शमीनं करून दाखवलं

शमीनं १७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १८८ पेक्षा अधिक स्टाइक रेटनं धावा कुटताना ३२ धावांची दमदार खेळी केली. बंगालच्या संघाकडून कोणत्याही खेळाडूनं केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली.   त्याच्या या खेळीच्या जोरावर बंगालच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली.

टॅग्स :मोहम्मद शामीभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट