Ben Stokes announces retirement - वर्ल्ड कप फायनल अन् तो अफलातून झेल! बेन स्टोक्स या दोन व्हिडीओनी जगाला लावलेलं वेड; विराट कोहलीकडून मोठं विधान 

Ben Stokes announces retirement from ODI cricket : ३१ वर्षीय स्टोक्सने २०११मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १०४ सामन्यांत त्याच्या नावावर तीन शतकांसह २९१९ धावा व ७४ विकेट्स आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:20 PM2022-07-18T18:20:50+5:302022-07-18T18:24:40+5:30

whatsapp join usJoin us
Ben Stokes announces retirement - ben stokes knock in 2019 World Cup final will be remembered forever, Virat Kohli reaction goes viral  | Ben Stokes announces retirement - वर्ल्ड कप फायनल अन् तो अफलातून झेल! बेन स्टोक्स या दोन व्हिडीओनी जगाला लावलेलं वेड; विराट कोहलीकडून मोठं विधान 

Ben Stokes announces retirement - वर्ल्ड कप फायनल अन् तो अफलातून झेल! बेन स्टोक्स या दोन व्हिडीओनी जगाला लावलेलं वेड; विराट कोहलीकडून मोठं विधान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ben Stokes announces retirement from ODI cricket : '' वन डे क्रिकिटेमधील निवृत्तीचा निर्णय पचणारा नसला तरी पटणारा नक्की आहे. मी आता या फॉरमॅटमध्ये १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्याजागी प्रतिभावान खेळाडूला संघात स्थान मिळायला हवं. तीन फॉरमॅट खेळणे हे आता शक्य नाही. वेळापत्रक पाहता तीनही फॉरमॅटच्या क्रिकेटला न्याय देऊ शकत नाही. आता माझ्याकडे जे काही आहे ते मला कसोटी क्रिकेटला द्यायचे आहे आणि या निर्णयानंतर मी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करू शकेन, असे मला वाटते,''असे बेन स्टोक्सने सोशल मीडियावर लिहिले आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला रामराम केला. मंगळवारी डरहॅम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळणार आहे.


बेन स्टोक्सच्या या निर्णयानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे CEO क्लेअर कॉनोर यांनी म्हटेल की, बेन स्टोक्स हा तीनही फॉरमॅटमधील सुपरस्टार आहे. आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०१९ फायनलमधील त्याची अविश्वसनीय खेळी कोणीच विसरणार नाही. त्याच्यामुळेच इंग्लंडने प्रथमच वन डे वर्ल्ड कप उंचावला. वन डेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय हा तो  निस्वार्थी असल्याचा दाखला आहे आणि त्याने संघाचे दीर्घकालीन हित पाहून तो घेतलेला आहे.''  भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यानेही ट्विट केले की, '' मी खेळलेल्या प्रतिस्पर्धींपैकी सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पर्धी तू आहेस. आदर.''

३१ वर्षीय स्टोक्सने २०११मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १०४ सामन्यांत त्याच्या नावावर तीन शतकांसह २९१९ धावा व ७४ विकेट्स आहेत. २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या वर्ल्ड कप फायनल लढतीत स्टोक्सने नाबाद ८४ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.  त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने घेतलेली कॅच ही क्रिकेटच्य़ा इतिहासातील सर्वोत्तम मानली जातेय.

पाहा हे दोन अफलातून व्हिडीओ...



 

Web Title: Ben Stokes announces retirement - ben stokes knock in 2019 World Cup final will be remembered forever, Virat Kohli reaction goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.