Join us
Daily Top 2Weekly Top 5

BCCI चा 'मेगा प्लॅन'! ODI वर्ल्ड कपसाठी संभाव्य संघ ठरला; IPL मध्ये याच खेळाडूंवर असतील नजरा

असा आहे BCCI चा मेगा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:12 IST

Open in App

BCCI Selector's Eyes on IPL Players For ODI WC 2027 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसीच्या आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या मेगा प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे.  स्पर्धेला अजून वर्षभराचा कालावधी असला तरी टीम इंडियातील संभाव्य २० खेळाडूंची यादी जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

BCCI चा मेगा प्लॅन, त्या २० खेळाडूंवर असतील नजरा

पीटीआयने बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील वर्षी होणाऱ्या या वनडे वर्ल्ड कपसाठी खेळाडूंच्या निवडीमध्ये इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरी निर्णायक ठरणार आहे. BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर  यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील एसएस दास, आरपी सिंह, अजय रात्रा आणि प्रज्ञान ओझा हे सदस्य IPL मधील खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवून असतील.

“ती बाळासोबत एकटीच… मला घरी थांबावेच लागेल!” PBKS चा स्टार लॉकी फर्ग्यूसन IPL आधी मोठ्या ब्रेकवर

निवड समितीतील प्रत्येकाला वाटून देण्यात आली आहे जबाबदारी

२०२७ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा नियोजित आहे. या स्पर्धेसाठी मजबूत संघ बांधणी करण्याच्या उद्देशाने बीसीसीआय निवड समितीचे सदस्य आपापल्या शहरातील IPL सामन्यावेळी स्टेडियमवर उपस्थितीत राहतील. आगरकर मुंबईत राहतात त्यामुळे वानखेडेच्या मैदानातील सामन्यांवेळी त्यांची उपस्थितीत पाहायला मिळू शकते. एसएस दास कोलकाता, आरपी सिंह आणि अजय रात्रा दिल्लीच्या मैदानातील तर ओझा बंगळुरु आणि हैदराबादच्या मैदानातील सामन्यासाठी स्टेडियमवर दिसतील.

असा आहे BCCI चा मेगा प्लॅन

बीसीसीआयच्या मेगा प्लॅननुसार, निवडकर्ते प्रत्येक आठवड्याला किमान एक सामना स्टेडियमवर जाऊन पाहणे अपेक्षित आहे. या दरम्यान ते संभाव्य संघाचा भाग असलेल्या खेळाडूंच्या फिटनेसवर आणि कामगिरीवर नजर ठेवतील. हर्षित राणाला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे वनडे वर्ल्ड कपसाठीच्या गोलंदाजांच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांच्यासह हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपच्या रनणितीचा भाग असणाऱ्या खेळाडू आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त होणार नाहीत, यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BCCI's mega plan: Eyes on IPL for ODI World Cup squad.

Web Summary : BCCI plans for the 2027 ODI World Cup, monitoring IPL player performances to finalize a squad of 20. Selectors will attend IPL matches, focusing on fitness and form, with key bowlers like Bumrah and Siraj in consideration.
टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघवन डे वर्ल्ड कपअजित आगरकर