India Test squad for England 2025 tour announced; New Captain, Vice-Captain picked : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर आता नव्या कर्णधारासह टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या हंगामाला सुरुवात करत आहे. या आव्हानात्मक दौऱ्यासाठी टीम इंडियातील प्रिन्स अर्थात शुबमन गिल याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुबमन गिल हा भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार ठरलाय. याशिवाय रिषभ पंतला उप कर्णधार करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
साई सुदर्शनसह या नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी, कुणाचा पत्ता झाला कट?
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघाचा कर्णधार असलेल्या अभिमन्यू ईश्वरन यालाही संघात स्थान मिळाले आहे. या दौऱ्यात त्याला रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. करुण नायरचे बऱ्याच वर्षांनी संघात कमबॅक झाले असून आयपीएलमध्ये शुबमन गिलसोबत गुजरातच्या ताफ्यातून धमक दाखवणाऱ्या साई सुदर्शन याचीही भारतीय कसोटी संघात वर्णी लागली आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघातून सरफराज खान आणि मोहम्मद शमीचा पत्ता कट झाल्याचे दिसते.
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उप-कर्णधार), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, अभिमन्य ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव,
असा आहे भारताचा इंग्लंड दौरा
- २० जून - पहिला कसोटी सामना: हेडिंग्ले, लीड्स
- २ जुलै - दुसरा कसोटी सामना: एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
- १० जुलै - तिसरा कसोटी सामना: लॉर्ड्स, लंडन
- २३ जुलै - चौथी कसोटी: ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- ३१ जुलै - केनिंग्टन ओव्हल, लंडन