"त्याला बरं वाटतंय पण...", अय्यरच्या दुखापतीनं वाढलं टेन्शन; BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

आज आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:07 PM2023-09-12T14:07:09+5:302023-09-12T14:07:52+5:30

whatsapp join usJoin us
BCCI says Shreyas Iyer will not play in Asia Cup 2023 ind vs sl match due to back injury  | "त्याला बरं वाटतंय पण...", अय्यरच्या दुखापतीनं वाढलं टेन्शन; BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

"त्याला बरं वाटतंय पण...", अय्यरच्या दुखापतीनं वाढलं टेन्शन; BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

shreyas iyer injury : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. काल भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर आज टीम इंडिया आशियाई किंग्ज श्रीलंकेशी भिडत आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. याबाबत बीसीसीआयने अपडेट्स दिले असून श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात देखील अय्यर प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणार आहे. 

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे पण पाठीच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि म्हणून श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या सुपर ४ सामन्यासाठी आज तो संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,  

Web Title: BCCI says Shreyas Iyer will not play in Asia Cup 2023 ind vs sl match due to back injury 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.