Join us  

ISKCONच्या समाजकार्यात 'दादा' चा हातभार; गांगुलीच्या मदतीमुळे 10 हजार लोकांचं भरणार पोट

गांगुलीनं यापूर्वी 20 हजार किलो तांदूळ दान केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 6:52 PM

Open in App

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण जग एकजुटीनं काम करताना दिसत आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 11 लाख 20,106 रुग्ण आढळले आहेत. त्यापेली 59,257 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 2 लाख 29,853 रुग्ण बरे झाले आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज पुढे आले आहेत. 

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे आणि या काळात गरिबांना दोन वेळेचं जेवण देण्याचं काम काही संस्था करत आहेत. लॉकडाऊनमुळे रोजंदारी कामगारांवर उपसामारीची वेळ आली आहे. अशा लोकांचं पोट भरण्यासाठी कोलकाता येथील इस्कॉनने पुढाकार घेतला आहे आणि त्यांच्या मदतीला टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली पुढे आला आहे. इस्कॉन पश्चिम बंगालमधील 10 हजार लोकांना दररोज अन्न पुरवण्याचं काम करत आहेत. 

पण, गांगुलीच्या पुढाकारामुळे आता इस्कॉननं दररोज 20 हजार लोकांना अन्न पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. गांगुलीनं पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काही दान केले आहे आणि त्याच्या फाऊंडेशनकडून अनाथ व वृद्धाश्रमातील लोकांना अन्न पुरवण्याचं काम सुरू आहे. 

''कोलकातातील इस्कॉनच्या वतीनं दररोज 10 हजार लोकांना जेवण दिलं जातं आणि सौरव गांगुलीनं मदतीचा हात पुढे केल्यामुळे आम्ही 20 हजार लोकांना जेवण देणार आहोत,''असे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी सांगितले.   गांगुलीनं यापूर्वी 20 हजार किलो तांदूळ दान केले आहेत. शिवाय बीसीसीआयनंही पंतप्रधान सहाय्यता निधीत 51 कोटी दिले आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान

Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय

Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत

Shocking : कोरोना व्हायरसमुळे खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू

Ms Dhoniच्या हेअर स्टायलिस्टची नोकरी धोक्यात; Video पाहून कळेल खरं कारण

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यासौरभ गांगुलीबीसीसीआय