Join us  

IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार?

देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा हजाराच्यावर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि तो 14 एप्रिलपर्यंत राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:43 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर 29 मार्चला सुरू होणारी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. पण, तरीही लॉकडाऊनमुळे आणि सध्याची परिस्थिती पाहता यंदा आयपीएल एप्रिल-मे मध्ये खेळवण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खेळवण्याय येईल, अशी चर्चा आहे. तसे झाल्यात आशिया चषक 2020 स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

मोठी बातमी; टोक्यो ऑलिम्पिकनंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलणार?

देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा हजाराच्यावर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि तो 14 एप्रिलपर्यंत राहील. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवण्याच्या विचारात आहे. पण, या कालावधीत आशिया चषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामुळे जर गरज असल्यास आशिया चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल. ''आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार सुरू आहे,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं हिंदुस्तान टाईम्सला सांगितले. 

टीम इंडियाच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांचे आयोजन होणार आहे. याच काळात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन महिने क्रिकेट मालिका होणार आहे. पण, या कालावधीत ऑस्ट्रेलियनं संघ फ्री आहे. जर परदेशी खेळाडूंचा सहभाग निश्चित होत असेल, तर बीसीसीआय आयपीएल ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये खेळवू शकते. बीसीसीआय हा मुद्दा आशिया क्रिकेट परिषदेसमोर ठेवणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!

डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज

रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार

 महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान

सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआयपीएल 2020बीसीसीआयएशिया कप