Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला!

आशिया चषक २०२३ स्पर्धेबाबत निर्णय घेण्याची अंतिम मुदत संपली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 03:52 PM2023-05-22T15:52:10+5:302023-05-22T15:52:32+5:30

whatsapp join usJoin us
BCCI is willing to go ahead with the “hybrid” model of Asia Cup, wants written assurance from the PCB on visiting India for the World Cup 2023 in October | Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला!

Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषक २०२३ स्पर्धेबाबत निर्णय घेण्याची अंतिम मुदत संपली आहे... पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) अन्य सदस्यांचा वाढता पाठिंबा पाहता आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. पण, बीसीसीआयने नवीन अट ठेवली आहे. PCB ने ऑक्टोबरमध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्याची लेखी हमी द्यावी, अशी अट ठेवली गेली आहे. 

भारतात जा, वर्ल्ड कप जिंका; BCCI साठी ही मोठी चपराक असेल - शाहिद आफ्रिदी बरळला

बीसीसीआयच्या २७ मे रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पाकिस्तानी मिडीयाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयची हायब्रिड मॉडेलबाबतची भूमिका मवाळ झाली आहे. संपूर्ण आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानबाहेर व्हावी असा हट्ट बीसीसीआयने सोडला आहे आणि आता तटस्थ ठिकाणी खेळण्यासाठी तयार आहेत. पाकिस्तानने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची धमकी दिल्याने, बीसीसीआय बॅकफूटवर गेली आहे. पाकिस्तानच्या हायब्रिड मॉडेलला बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनी पाठिंबा दिला आहे.  

Asia Cup 2023: काय आहे हायब्रिड मॉडेल?

  • नव्या हायब्रिड मॉडेलनुसार स्पर्धा दोन टप्प्यात होईल
  • पहिल्या टप्प्यात भारत वगळता अन्य संघ पाकिस्तानात खेळतील
  • दुसऱ्या टप्प्यात भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील
  • संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका यांच्यापैकी एका ठिकाणाची निवड होईल
  • पण, बीसीसीआय, बांगलादेश आणि श्रीलंका यांनी UAEला हिट समस्येमुळे नकार दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेत दुसरा टप्पा होण्याची शक्यता आहे. 
  • भारतीय संघ अंतिम फेरीत गेला नाही, तरी फायनल ही तटस्थ ठिकाणीच होईल

PCB अध्यक्ष नजम सेठी यांचा पलटवार
बीसीसीआयच्या लेखी हमीवर नजम सेठींनी पलटवार केला आहे. आमच्या सरकारने परवानगी दिली, तर आम्ही भारतात जाऊ. भारत आमच्याकडून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेबाबत लेखी हमी मागत असेल तर त्यांनीही २०२५ साली पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागाची हमी द्यावी, असेही ते म्हणाले. 

Web Title: BCCI is willing to go ahead with the “hybrid” model of Asia Cup, wants written assurance from the PCB on visiting India for the World Cup 2023 in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.