Join us

BCCI ला पांड्यावर भरवसा नाय काय? टीम इंडियात 'हार्दिक' स्वागत; पण VC 'अक्षर' झालं पटेलचं

ही गोष्ट BCCI च्या नजरेत हार्दिक पांड्याचं मूल्य कमी झाल्याचं संकेत देणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 23:08 IST

Open in App

बीसीसीआयनं इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानात रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात पांड्याचं 'हार्दिक' स्वागत झालंय. पण तो संघात असताना उप कॅप्टन्सीचं नाव 'अक्षर' मात्र पटेलच्या नावापुढे लागलं आहे. ही गोष्ट BCCI च्या नजरेत हार्दिक पांड्याचं मूल्य कमी झाल्याचं संकेत देणारी आहे. IPL मध्ये लोकप्रिय फ्रँचायझी संघाची कॅप्टन्सी करणारा हार्दिक पांड्या रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या टी-२० संघाच्या कर्णधार पदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. कारण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो संघाच्या उप कर्णधारपदी होता. टीम इंडियानं ही स्पर्धा जिंकली, रोहितनं निवृत्ती घेतली अन् टीम इंडियातील कॅप्टन्सीची माळ सूर्यकुमार यादवच्या गळ्यात पडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

BCCI ला हार्दिक पांड्यावर भरवसा  नाय काय?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं गत वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर दिमाखदार कामगिरी करत वर्षाचा शेवट गोड केला होता. यावेळीही हार्दिक पांड्या संघाचा भाग होता. पण त्यावेळी भारतीय संघाच्या उप-कर्णधार पदाची जबाबदारी कुणावरच सोपवण्यात आली नव्हती. मात्र यावेळी टीम इंडियात मोठा बदल झाला असून अक्षर पटेलच्या रुपात बीसीसीआयने हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट शोधल्याचे पाहायला मिळते. अक्षर पटेलला मिळालेली बढती ही बीसीसीआयला आता हार्दिक पांड्यावर भरवसा राहिला नाही, असे संकेत देणारी आहे.

या स्टार खेळाडूंची नाही लागली टी-२० संघात वर्णी

बीसीसीआयनं जो १५ सदस्यीय संघ निवडला आहे त्या संघात शुबमन गिल, रिषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यासारख्या टीम इंडियातील स्टार मंडळींनाही स्थान मिळालेले नाही. त्याऐवजी BCCI नं अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल या मंडळींना पुन्हा संधी दिल्याचे पाहायला मिळते. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी वर्कलोड मॅनेज करण्याच्या दृष्टीने त्यांना संघाबाहेर ठेवलं असा अंदाज लावायचा झाला तर ही मंडळी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियात जवळपास फिक्स असल्याचेही संकेत मिळतात.  

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर बॅटर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उप कर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वाशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर). 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्याअक्षर पटेलबीसीसीआयमोहम्मद शामीभारत विरुद्ध इंग्लंड