India vs Australia, 4th Test Day 5 : संकटांवर मात करताना टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. अॅडलेडवरील '३६'च्या आकड्यानंतर टीम इंडिया असा कमबॅक करेल, याचा स्वप्नातही ऑस्ट्रेलियन संघानं विचार केला नव्हता. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल, रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी शानदार खेळ केला. भारतानं ३ विकेट राखून हा सामना जिंकला. भारतीय संघाच्या या विजयानंतर बीसीसीआयनंही संघाचं कौतुक केलं आहे. तसंच संघाला ५ कोटी रूपयांचा विशेष बोनसही जाहीर केला आहे. "बीसीसीआयनं भारतीय संघाला पाच कोटी रूपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे. क्रिकेटमधील काही निवडक आणि विशेष क्षणांपैकी एक हा क्षण आहे. भारतीय संघानं उत्तम खेळ आणि उत्तम कौशल्य दाखवलं आहे," असं ट्वीट बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी केलं.मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर गुंडाळला. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाची २६ षटकं वाया गेली आणि पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस
India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस
भारतानं सामना जिंकत मालिकाही घातली खिशात
By जयदीप दाभोळकर | Updated: January 19, 2021 13:52 IST
India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस
ठळक मुद्देभारतानं सामना जिंकत मालिकाही घातली खिशातबीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी केलं भारतीय संघाचं कौतुक