भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) काही क्रिकेटर्सवर अन्याय करते, हा मुद्दा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात आता आणखी एका नव्या गोष्टीची भर पडली आहे. ६ डिसेंबरला ५ क्रिकेटर आपला बर्थडे साजरा करतात. BCCI नं यातील फक्त चौघांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. सेहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये दुसरा त्रिशतकवीर ठरलेल्या करुण नायरकडे BCCI नं दुर्लक्ष केले आहे. हा मुद्दा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हे पाच क्रिकेटर एकाच दिवशी साजरा करतात आपला वाढदिवस
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, वनडे संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यर, ऑल राउंडर रवींद्र जडेजा आणि माजी जलदगती गोलंदाज आरपी सिंह यांच्यासह करुण नायर ६ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करतो. BCCI नं करुण नायर वगळता अन्य चौघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करुनही पुरेशी संधी न देचा ज्याच्यावर अन्याय झाला, अशी चर्चा रंगली तो करुण नायर इथंही दुर्लक्षित झाल्याचे पाहायला मिळाले.
डियर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स!.. म्हटल्यावर तो टीम इंडियात आला, पण...
करुण नायरनं २०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतकी खेळी केली होती. या दमदार खेळीनंतरही त्याला भारतीय संघाकडून सातत्यपूर्ण संधी मिळाली नाही. डियर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स!.. असं म्हणत या पठ्ठ्यानं क्रिकेटच्या मैदानात धावा करण्याच भूक असल्याची 'मन की बात' बोलून दाखवली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खोऱ्यानं धावा करत त्याने ८ वर्षांनी भारतीय संघात स्थान मिळवले. हा दौरा झाला अन् तो पुन्हा संघाबाहेर गेला. चार सामन्यात त्याने फक्त एकच अर्धशतक झळकावले. ही कामगिरी समाधानकारक निश्चित नव्हती. पण त्याला जो वेळ द्यायला हवा तो यावेळीही मिळाला नाही. त्यात आता वाढदिवसाच्या पोस्टमध्ये त्याची फ्रेम दिसत नसल्यामुळे तो BCCI च्या मर्जीतील खेळाडू नाही, असे काहीसे चित्र निर्माण होत आहे.