Ajit Agarkar On Shubman Gill Dropped India’s Squad For ICC Men’s T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ज्या गिलचा आशिया कप स्पर्धेपासून लाड सुरू होता त्याला अखेर संघाबाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या जागी उप कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा अष्टपैलू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटी आणि वनडेचा कर्णधार टी-२० वर्ल्ड कपच्या संघातून OUT
कसोटी पाठोपाठ वनडेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलेल्या शुभमन गिलने आशिया कप टी-२० स्पर्धेत दोन वर्षांनी संघात एन्ट्री मारली होती. संघात परतल्यावर त्याच्याकडे उपकर्णधार पदही देण्यात आले. पण सातत्याने संधी मिळूनही त्याला आपली छाप सोडता आली नव्हती. तो सर्वोत्तम खेळाडू आहे, पण संघातील संतुलनाचा विचार करून टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ बाधणी केली, असे बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी गिलसंदर्भात म्हटले आहे. नेमकं ते काय म्हणाले? जाणून घेऊयात सविस्तर
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
गिलसंदर्भात नेमकं काय म्हणाले अजित आगरकर?
"सर्व बाजूंचा विचार करुन टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड करण्यात आली आहे. आघाडीच्या फलंदाजीत आम्हाला यष्टीरक्षक फलंदाजाची आवश्यकता होती. शुभमन गिल हा प्रतिभावंत खेळाडू आहे. पण तो सातत्याने टी-२० खेळत नव्हता. संघातील संतुलनाचा विचार करून त्याला संघाबाहेर ठेवण्याच निर्णय घेण्यात आला, असे आगरकरांनी म्हटले आहे. यशस्वी जैस्वालच्या नावाचा उल्लेख करत तोही सर्वोत्तम आहे. पण संघात फक्त १५ खेळाडूंची निवड करायची असते. संतुलित संघ बांधणीसाठी जे आवश्यक आहे, तो निर्णय घेतला आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.
टी-२० वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उप कर्णधार) संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे,रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.