Join us
Daily Top 2Weekly Top 5

BCCI कडून झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर; IPL गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना मिळू शकते मोठी संधी

BCCI Announces India's Tour Of Zimbabwe Schedule : कधी अन् कोणत्या मैदानात खेळवण्यात येणार झिम्बाब्बे-भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेतील सामने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:10 IST

Open in App

BCCI Announces India's Tour Of Zimbabwe Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय संघाने २०२४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. दोन वर्षांनी होणाऱ्या या दौऱ्यात IPL मध्ये धमक दाखवणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कधी अन् कोणत्या मैदानात रंगणार भारत-झिम्बाब्वे यांच्यातील सामने?

बीसीसीआने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २३ जुलै ते २५ जुलै या दरम्यान भारत-झिम्बाब्वे यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत सर्व सामने झिम्बाब्वेतील हरारेच्या मैदानात खेळवण्यात येतील.  

श्रेयस अय्यरला १२ लाखांचा मोठा दणका! IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यानंतर BCCIची कारवाई

असा असेल भारताचा झिम्बाब्वे दौरा 

  • २३ जुलै , २०२६ झिम्बाब्वे विरुद्ध भारत, पहिला टी-२० सामना, हरारे 
  • २५ जुलै, २०२६ झिम्बाब्वे विरुद्ध भारत, दुसरा टी-२० सामना, हरारे
  • २६ जुलै, २०२६ झिम्बाब्वे विरुद्ध भारत, तिसरा टी-२० सामना, हरारे 

याआधी टीम इंडियाने कधी केला होता झिम्बाब्वेचा दौरा? निकाल काय लागला?

२०२४ मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने जुलै  २०२४ मध्ये झिम्बाब्वे दौरा केला होता. या दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर उर्वरित चारही सामने जिंकून टीम इडियाने मालिका ४-१ अशी जिंकली होती.  

झिम्बाबेही भारत दौऱ्यावर येणार

झिम्बाब्वेचा संघही पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खळवण्यात येईल. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना  कोलकाता, दुसरा हौदराबाद तर तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना मुंबईत नियोजित आहे.  

झिम्बाब्वे दौऱ्यावर स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा डाव बीसीसीआयकडून खेळला जाऊ शकतो. क्रिकेट जगतात सध्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे नाव गाजत आहे. या युवा खेळाडूसह अन्य काही युवा खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियात संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : BCCI Announces India's Zimbabwe Tour; Young IPL Stars May Get Chance

Web Summary : BCCI announced India's Zimbabwe tour featuring three T20 matches in July 2026. The series will be held in Harare. Following a 2024 series win, this tour may showcase young IPL talents. Zimbabwe will also tour India next year for ODIs.
टॅग्स :भारत-झिम्बाब्वेबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ