ICC कडून फक्त ट्रॉफी अन् मेडल्स; BCCI नं उघडली तिजोरी! वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती कोटी मिळणार?

BCCI नं वर्ल्ड चॅम्पियन युवा खेळाडूंसाठी कोट्यवधींच बक्षीस जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:41 IST2026-02-07T17:29:08+5:302026-02-07T17:41:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BCCI Announces Big Cash Reward For Indian U19 World Cup Winning Team Board Will Give 7-5 Crores | ICC कडून फक्त ट्रॉफी अन् मेडल्स; BCCI नं उघडली तिजोरी! वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती कोटी मिळणार?

ICC कडून फक्त ट्रॉफी अन् मेडल्स; BCCI नं उघडली तिजोरी! वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला किती कोटी मिळणार?

BCCI Announces Cash Prize India's U19 World Cup Winning Squad : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आयुष म्हात्रेच्या युवा टीम इंडियाने तगड्या इंग्लंडच्या संघाला १०० धावांनी पराभूत करत सहाव्यांदा जेतेपद मिळवले. या विक्रमी कामगिरीसह युवा टीम इंडियाने नवा इतिहास रचला. पण ICC कडून संघाला फक्त ट्रॉफी मिळाली. त्यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वर्ल्ड कप विजेत्या संघासाठी तिजोरी उघडणार आहे. BCCI नं वर्ल्ड चॅम्पियन युवा खेळाडूंसाठी कोट्यवधींच बक्षीस जाहीर केले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बीसीसीआयने उघडली तिजोरी! भारतीय अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या संघाला कोट्यवधींच बक्षीस

वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी आता बीसीसीआयने आपला खजिना खुला केला आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीसाठी BCCI नं कोट्यवधींच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.  बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.  खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बोर्डाने ही मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ICC U19 World Cup : युवा टीम इंडियाचा 'सिक्सर' अन् मराठमोळा आयुष म्हात्रे थेट किंग कोहलीच्या पंक्तीत

ANI शी संवाद साधताना बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला ७.५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या सदस्य सर्वांसाठी मिळून हे बक्षीस दिले जाणार आहे.


 
 ICC कडून भारतीय संघाला रोख बक्षीस नाही; कारण...

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सामान्यतः ICC कडूनही विजेत्या संघाला बक्षीस दिले जाते, मात्र अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये असे झाले नाही. या विजेतेपदासाठी ICC कडून टीम इंडियाला कोणतेही रोख बक्षीस मिळाले नाही, आणि खेळाडू केवळ पदकांसह परतले. याचे कारण असे की, अंडर-१९ स्तरावर ICC कोणतीही बक्षीस रक्कम देत नाही, कारण ही स्पर्धा तरुण खेळाडूंच्या विकासासाठी आयोजित केली जाते. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना ICC कडून कोणतेही रोख बक्षीस मिळाले नाही.

U19 वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाका!

 १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलपर्यंत वैभव सूर्यवंशीनं ३ अर्धशतके झळकावली. पण त्याला यातील एकाही खेळीचे शतकात रुपांतर करण्यात आले नव्हते. पण फायनलमध्ये त्याचा धमाकेदार शो पाहायला मिळाला. ८० चेंडूत १७५ धावांची स्फोटक खेळी करत त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तो सामनावीर आणि मालिकावीरही ठरला.
 

Web Title : BCCI ने U19 विश्व कप विजेताओं को पुरस्कृत किया; ICC ने सिर्फ पदक दिए।

Web Summary : बीसीसीआई भारत की अंडर-19 विश्व कप विजेता टीम, जिसमें खिलाड़ी, कर्मचारी और चयनकर्ता शामिल हैं, को ₹7.5 करोड़ का पुरस्कार देगा। आईसीसी इस स्तर पर नकद पुरस्कार नहीं देता है, खिलाड़ी विकास पर ध्यान केंद्रित करता है। वैभव सूर्यवंशी फाइनल में चमके।

Web Title : BCCI rewards U19 World Cup winners; ICC offers only medals.

Web Summary : BCCI will award ₹7.5 crore to India's U19 World Cup winning team, including players, staff, and selectors. ICC doesn't offer cash prizes at this level, focusing on player development. Vaibhav Suryavanshi starred in the final.