इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालली संघात मोहम्मद शमीलाही संधी देण्यात आली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो टीम इंडियात कमबॅक करत आहे. विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू सॅमसनला पहिली पसंती देण्यात आली असून ध्रुव जुरेल याचीही टी-२० संघात वर्णी लागली आहे. पण पंतला टी-२० संघात स्थान मिळालेले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
असा आहे इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर बॅटर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उप कर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वाशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर).
कधी अन् कुठं रंगणार टी-२० मालिकेचा थरार?
नव्या वर्षात भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मालिकेतून मर्यादीत षटकांच्या मालिकेची सुरुवात करणार आहे. २२ जानेवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामन्यांची नाणेफेक ६ वाजून ३० मिनिटांनी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजलेपासून सामन्याला सुरुवात होईल. २२ जानेवारीला पहिला टी-२० सामना कोलकाताच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २५ जानेवारीला दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईच्या मैदानात उतरतील. २८ आणि ३१ जानेवारीला अनुक्रमे राजकोट आणि पुण्याच्या मैदानात सामा खेळवण्यात येणार असून २ फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडेच्या मैदानात या मालिकेची सांगता होईल.