BCCI Announced Team India’s Squad For Test Series Against South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात रिषभ पंत पुनरागमन झाले आहे. इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीतून सावरून संघात परतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पुन्हा त्याच्याकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवींद्र जडेजाकडे तात्पुरत्या स्वरुपात उप कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती.
पंत संघात परतल्यावर एन जगदीशन 'आउट'; प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाशदीपची एन्ट्री
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेबरला गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघात जो संघ होता त्यात मोजके बदल करण्यात आले असून पंत संघात आल्यामुळे एन जगदीशन संघाबाहेर गेला आहे. याशिवाय गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक/ उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप